Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > Easy Cleaning Hacks : फक्त ५ मिनिटात दूर होईल नळ, फरशीवरचा गंज; स्वच्छ, चकचकीत घरासाठी या घ्या टिप्स

Easy Cleaning Hacks : फक्त ५ मिनिटात दूर होईल नळ, फरशीवरचा गंज; स्वच्छ, चकचकीत घरासाठी या घ्या टिप्स

Easy Cleaning Hacks : बेकिंग सोडा फक्त जेवणातच वापरला जात नाही तर त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2022 01:14 PM2022-02-18T13:14:49+5:302022-02-18T13:38:03+5:30

Easy Cleaning Hacks : बेकिंग सोडा फक्त जेवणातच वापरला जात नाही तर त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करू शकता.

Easy cleaning hacks for home : Easy tips to remove rust from bathroom taps | Easy Cleaning Hacks : फक्त ५ मिनिटात दूर होईल नळ, फरशीवरचा गंज; स्वच्छ, चकचकीत घरासाठी या घ्या टिप्स

Easy Cleaning Hacks : फक्त ५ मिनिटात दूर होईल नळ, फरशीवरचा गंज; स्वच्छ, चकचकीत घरासाठी या घ्या टिप्स

घरात रोज कितीही आवराआवर केली तर अस्वच्छता काही कमी होत नाही. बाहेरून येणारी धूळ आणि घरातील वापराच्या वस्तूंमुळे येणारा गंज काढणं कठीण होतं. कोणतीही लोखंडी वस्तू फरशीवर ठेवल्यानंतर तसंच  सतत पाणी लागल्यानं बाथरूम बेसिनचे नळ, फरशीवर गंज चढतो. साबणानं कितीही घासलं तरी गंज निघता निघत नाही. (Home Cleaning Tips and hacks)

तुमच्या बाथरूममधील नळही गंजला असेल, नळ बदलण्याची गरज नाही, पण गंज काढण्याची गरज आहे. होय, आज या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स आणि हॅक्स सांगणार आहोत, ज्याचा अवलंब करून तुम्ही काही मिनिटांत नळावरील गंज काढून टाकू शकता, तर चला जाणून घेऊया. (Easy tips to remove rust from bathroom taps)

बेकींग सोडा

बेकिंग सोडा फक्त जेवणातच वापरला जात नाही तर त्याच्या मदतीने तुम्ही घरच्या अनेक कठीण गोष्टी सोप्या करू शकता. बाथरूमच्या नळात गंज आला असेल तर तो काढण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. यासाठी दोन ते तीन चमचे बेकिंग सोडा, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक कप पाणी यांचे द्रावण तयार करा. द्रावण तयार केल्यानंतर, गंजलेल्या भागावर द्रावण चांगले लावा आणि काही वेळ सोडा. सुमारे 10 मिनिटांनंतर, क्लिनिंग ब्रशने घासून चांगले स्वच्छ करा.

हायड्रोजन पेरॉक्साईड

हायड्रोजन पेरोक्साईडच्या मदतीने तुम्ही टॅपमधील गंज सहज काढू शकता. यासाठी दोन ते तीन चमचे हायड्रोजन पेरॉक्साइड द्रव नळावर चांगले फवारावे. फवारणी केल्यानंतर, ते सुमारे 30 मिनिटे सोडा.३0 मिनिटांनंतर, गंजलेल्या भागाला सॅंडपेपरने घासून घ्या. तुम्हाला दिसेल की गंज निघून गेला आहे. गंज निघाला नाही तर ही प्रक्रिया पुन्हा करून पाहू शकता. 

लिंबू आणि गरम पाणी

लिंबू आणि कोमट पाण्याच्या मिश्रणाने तुम्ही बाथरूमच्या नळांवर लागलेला गंज देखील काढून टाकू शकता. यासाठी प्रथम गंजलेल्या भागावर द्रावणाची पेस्ट लावा आणि काही वेळ राहू द्या.  या लेपमुळे काही प्रमाणात गंज सहज निघतो. आणि उरलेला गंज काढण्यासाठी तुम्ही क्लिनिंग ब्रशने एक ते दोन मिनिटे घासू शकता. तुम्हाला दिसेल की टॅपमधून गंज गायब आहे.

व्हिनेगर आणि बेकिंग सोडा

 नळावरील गंज काढण्यासाठी व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण देखील उत्तम उपाय ठरू शकते. यासाठी क्लिनिंग ब्रश मिश्रणात भिजवून एक ते दोन मिनिटे गंजलेल्या भागावर घासून घ्या. यामुळे गंज सहज निघतो. या व्यतिरिक्त, तुम्ही हे मिश्रण फरशीवरील गंजलेल्या भागावर लावू शकता आणि क्लिनिंग ब्रशने स्वच्छ करू शकता.

Web Title: Easy cleaning hacks for home : Easy tips to remove rust from bathroom taps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.