Join us   

Easy Cleaning Hacks :  सतत पाणी लागून बाथरूमचा दरवाजा खराब झालाय? या ट्रिक्सनी चकचकीत करा दरवाजा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 4:30 PM

Easy Cleaning Hacks : लाकडी दरवाजा असो किंवा प्लायवुडचा दरवाजा. पाच-सात महिने पाणी लागल्यावर दरवाजा खराब व्हायचाच. हाय कोटेड प्लास्टिकसह तुम्ही दरवाजा प्रोटेक्ट करू शकता.

बाथरुमसह किचनला लागून असलेल्या इतर दरवाज्यांचा रोज वारंवार वापर केला जातो. अशात रोज साफसफाई करूनही काही भाग खराब दिसायचे ते दिसतातच. घरातील बाथरुमचा दरवाजा असा आहे जो सामान्यतः इतर कोणत्याही दरवाजापेक्षा खराब असतो किंवा तो पाण्यामुळे फुगतो आणि नंतर सडू लागतो. (Home Cleaning Tips) तुमच्या घरातील दरवाजाही सतत खराब होत असेल तर या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही काही मिनिटात दरवाजा स्वच्छ करू  शकता. याशिवाय वारंवार खराब होण्यापासूनही रोखता येईल. (Easy Cleaning Hacks, Tips) 

प्लास्टिक पेंट

बाथरूमचा दरवाजा लाकडापासून लाकडाचा असेल आणि तो खालून सडत असेल किंवा फुगायला लागला असेल. तर तुम्ही यासाठी प्लास्टिक पेंट वापरू शकता. आजकाल असे अनेक रंगीत प्लॅस्टिक पेंट्स बाजारात सहज उपलब्ध आहेत. ज्यामुळे तुम्ही दरवाजा रंगवू शकता. प्लॅस्टिक पेंट दारावर पाणी टिकू देत नाही आणि सर्व पाणी सहजपणे वाहून जातं. दरवाजावर पाणी साचले तरच दरवाजा खराब होण्याची शक्यता असते. जर पाणी साचले नाही तर दरवाजाच्याचेही वर्षानुवर्ष नुकसान होणार नाही.

टिनचा वापर

टिनच्या मदतीने बाथरूमचा दरवाजा कसा सुरक्षित ठेवता येईल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. दारं पाण्यामुळे खराब होत असल्याने अनेक लोक बाथरूमच्या दरवाजाच्या मागे टिनपत्रेही लावतात. टिनपत्र किंवा आवरण लावल्याने दारावर पाणी साचत नाही आणि सर्व पाणी बाहेर पडते. विशेषतः, दरवाज्याचा तळाचा भाग सडतो, म्हणून आपण वरपासून खालपर्यंत टिन वापरणे आवश्यक आहे.

प्रायव्हेट पार्ट्सचा त्रास म्हणजे अवघड जागेचं दुखणं; 'या' ६ टिप्सनी 'व्हज्यायनल हेल्थ'ची घ्या काळजी

हाय कोटेड प्लॅस्टिक

लाकडी दरवाजा असो किंवा प्लायवुडचा दरवाजा. पाच-सात महिने पाणी लागल्यावर दरवाजा खराब व्हायचाच. हाय कोटेड प्लास्टिकसह तुम्ही दरवाजा प्रोटेक्ट करू शकता.  हाय कोटेड प्लॅस्टिक फक्त तुम्हाला दाराला चिकटवावं लागेल. यासाठी तुम्हाला जास्तवेळ आणि पैसेही खर्च करायला लागणार नाहीत. 

पन्नाशीत बिझनेस सुरू करून श्रीमंतांच्या पंक्तीत बसल्या; नायर ताईंचा बिझनेस सुरू करणाऱ्या महिलांना सल्ला

एल्यूमिनियम दरवाज्याचा वापर

दरवाजा पाण्याने खराब होणार नाही याची खात्री करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे अॅल्युमिनियमचा दरवाजा वापरणे. आजकाल असे अनेक एल्युमिनियमचे दरवाजे बाजारात सहज उपलब्ध आहेत, जे तुम्ही बाथरूमसाठी निवडू शकता. याशिवाय ते स्वस्त आणि टिकाऊदेखील आहेत.  

टॅग्स : स्वच्छता टिप्सआरोग्यसुंदर गृहनियोजनकिचन टिप्स