स्वयंपाकघरातील तेलाच्या डागांमुळे कपाट, डबे, स्विच बोर्ड, भांडी, भिंती, छत, एक्झॉस्ट फॅन इत्यादी चिकट आणि घाण होतात, (Oil stains)ज्यामुळे तुमचे स्वयंपाकघर अतिशय गलिच्छ दिसते. (Kitchen Tips) तेलाचे डाग जास्त काळ असेच राहिल्यास ते घाणीचे थर साचतात आणि डाग कायमचे राहतात. (How to remove oil stains in kitchen) म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अशा काही किचन क्लीनिंग (Kitchen Cleaning Tips) सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही या तेलाच्या डागांपासून सहज आणि लवकर सुटका मिळवू शकता. (Quick Easy Kitchen Hacks)
व्हिनेगर
व्हाईट व्हिनेगर एक उत्कृष्ट सफाई करणारे एजंट आहे जे आपल्याला किचन स्वच्छ करण्यात मदत करेल. व्हिनेगर हा एक उत्तम नैसर्गिक घटक आहे. जो तेलाच्या धुरामुळे येणाऱ्या डागांशी लढू शकतो. जर डाग ताजे असतील तर ही साफसफाईची पद्धत वापरा. एक वाटी कोमट पाणी घ्या, त्यात कापड बुडवा आणि डाग असलेली जागा पुसून टाका. डाग हट्टी असतील तर पुढे, 1/2 कप व्हिनेगर आणि 1 कप कोमट पाण्याचे द्रावण तयार करा. या द्रावणात कापड किंवा स्पंज बुडवा आणि आपल्या स्वयंपाकघरातील तेलाचे डाग काढून टाका.
वनस्पती तेलाचा वापर
स्वयंपाकासाठी वनस्पती तेल वापरले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का, ते तेल आणि ग्रीसचे डाग साफ करण्यास मदत करू शकते. त्यासाठी एक टॉवेल घ्या आणि त्यात थोडे तेल घाला आणि स्वयंपाकघरातील डाग स्वच्छ करा. तुम्हाला दिसेल की ते तेल आणि ग्रीसचे डाग साफ करण्यात प्रभावीपणे मदत करते.
लिंबू, सोड्याचा वापर
एका लिंबाचे दोन तुकडे करा आणि डाग असलेल्या पृष्ठभागावर घासून घ्या. यानंतर सोड्याच्या पाण्यात कापड बुडवून जागा स्वच्छ करा. लिंबू किती प्रमाणात लागेल हे पृष्ठभागाचा आकार पाहून ठरवा.
डिश वॉश लिक्विडचा वापर करा
एका भांड्यात 2 चमचे डिशवॉशिंग लिक्विड कोमट पाण्यात मिसळा. तेलाचे डाग त्वरीत साफ करण्यासाठी हे मिश्रण खूप प्रभावी आहे. या मिश्रणात स्पंज बुडवा आणि डाग पडलेली जागा घासून घ्या. शेवटी स्वच्छ पाण्यात कापड बुडवा आणि डागांसह द्रावण पुसून टाका.
मीठ
मीठ तुमच्या स्वयंपाकघरातील एक असा घटक आहे ज्याशिवाय तुम्ही काही स्वादिष्ट बनवण्याचा विचारही करू शकत नाही. तुम्हाला प्रश्न पडत असेल की डाग साफ करण्यासाठी तुम्ही याचा वापर कसा करू शकता? तेल आणि ग्रीसच्या डागांवर ठराविक प्रमाणात मीठ शिंपडा. त्यानंतर बोरॅक्स द्रावण किंवा व्हिनेगरचे द्रावणातील त्या भागावर फवारणी करा आणि स्पंज किंवा ओल्या कापडाने पुसून टाका.
बेकींग सोडा
बेकिंग सोडा हे तुमच्या स्वयंपाकघरातील नको असलेले तेलाचे डाग काढून टाकण्यासाठी एक उत्तम क्लिनिंग एजंट आहे. 1 कप बेकिंग सोडा आणि 1 कप कोमट पाणी यांचे मिश्रण तयार करा. एक स्पंज घ्या आणि या द्रावणात बुडवा. स्पंजने तेलाचे डाग पुसून टाका.