Join us   

सर्दी-कफाने नाक-डोकं ब्लॉक झालंय? ५ मिनीटांत होणारे चेहऱ्याचे ३ सोपे व्यायाम, नाक होईल मोकळं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 9:45 AM

Easy Facial Exercises For Block Nose and Congestion This Winter : सर्दी-कफामुळे नाक-डोकं ब्लॉक झालं असे तर करा सोपे व्यायामप्रकार

ठळक मुद्दे सर्दीमुळे नाक बंद झाले असेल तर कसा सोपे व्यायाम कफामुळे डोकेदुखी झाल्यास औषधोपचारांपेक्षा घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय...

सततचा हवाबदल, वाढणारी थंडी आणि इतरही काही कारणांनी घरात कोणाला ना कोणाला सर्दी-कफ होतोच. एकदा एकाला कफ किंवा सर्दी झाली की घरात हळूहळू सगळ्यांनाच होते. व्हायरल असणारी ही समस्या कॉमन असली तरी एकदा कफ झाला की आपल्याला काहीच सुचत नाही. अनेकदा आपला कफ बाहेरही पडत नाही आणि लवकर जातही नाही. अशावेळी हा कफ नाक, डोकं यांमध्ये साचून राहतो (Easy Facial Exercises For Block Nose and Congestion This Winter).

यामुळे आपलं डोकं तर दुखतंच पण कपाळ, नाकाच्या बाजूचा भाग, डोक्याचा भाग, खांदे असं सगळंच जड झाल्यासारखं होतं. हे ब्लॉक झालेलं नाक मोकळं कसं करायचा असा यक्षप्रश्न आपल्याला अशावेळी पडतो. रात्री झोपल्यावर तर हे सगळं इतकं ब्लॉक होतं की आपल्याला नीट श्वासही घेता येत नाही. 

(Image : Google)

मग आपण कधी वाफ घेऊन हे ब्लॉकेज निघून जाईल यासाठी प्रयत्न करतो. तर कधी औषधे घेऊन कफ कमी करण्यासाठी प्रयत्न करतो, पण यामुळे तात्पुरता इलाज होतो. त्यापेक्षा काही सोप्या उपायांनी हा कफाचा त्रास कमी झाला तर? सायनसचा त्रास होत असेल तर आपल्याला कामही सुचत नाही आणि नीट आरामही करता येत नाही. नाकाच्या आजुबाजूचा सगळाच भाग कफामुळे ब्लॉक झाला असेल तर चेहऱ्याची ५ मिनीटांत होतील अशा काही सोप्या हालचाली केल्यास या समस्येपासून आराम मिळण्यास मदत होते. प्रसिद्ध योग अभ्यासक जूही कपूर आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर द योगिनी वर्ल्ड या पेजच्या माध्यमातून आपल्याला हे फेशियल योगाचे प्रकार दाखवतात. 

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्या कायम काही ना काही उपयुक्त माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. नाकाच्या आजुबाजूला योग्य पद्धतीने मसाज केल्यास सर्दी-कफामुळे झालेले ब्लॉकेजेस निघून जाण्यास मदत होते. व्हिडिओमध्ये दाखवलेले प्रत्येक टेक्निक १ मिनीटासाठी किंवा १५ ते २० वेळा करावे. तसेच हा मसाज करताना जास्त दाब न देता हळूवारपणे करावा. चेहऱ्यावर पुरळ किंवा रॅशेस आले असतील तर हा मसाज करणे टाळावे. तसेच थंडीमुळे तुमची त्वचा खूप कोरडी झाली असेल तर बदामाच्या तेलाचा उपयोग करावा. या मसाजमुळे डोकेदुखी थांबण्यास मदत होते. इतकेच नाही तर मायग्रेनचा त्रास होत असेल तर तो कमी होण्यासही याचा चांगला उपयोग होतो. सर्दी आणि कफामुळे एकप्रकारची अस्वस्थता आलेली असते ती कमी होण्यास या मसाजमुळे फायदा होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स