Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अॅसिडीटी, गॅसेस, छातीत जळजळ? तज्ज्ञ सांगतात, ६ सोपे उपाय, मिळेल आराम

अॅसिडीटी, गॅसेस, छातीत जळजळ? तज्ज्ञ सांगतात, ६ सोपे उपाय, मिळेल आराम

Easy Home Remedies for Acidity and Gases problems : उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी यांसारख्या समस्यांमुळे आपण पार हैराण होऊन जातो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2022 12:30 PM2022-09-28T12:30:07+5:302022-09-28T13:08:05+5:30

Easy Home Remedies for Acidity and Gases problems : उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी यांसारख्या समस्यांमुळे आपण पार हैराण होऊन जातो.

Easy Home Remedies for Acidity and Gases problems : Acidity, gas, heartburn? Experts say, 6 simple solutions, you will get relief | अॅसिडीटी, गॅसेस, छातीत जळजळ? तज्ज्ञ सांगतात, ६ सोपे उपाय, मिळेल आराम

अॅसिडीटी, गॅसेस, छातीत जळजळ? तज्ज्ञ सांगतात, ६ सोपे उपाय, मिळेल आराम

Highlightsत्यांच्या फॉलोअर्सची संख्याही बरीच जास्त असून त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही नेटीझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देतात. पाहूयात आता त्यांनी छातीतील जळजळ कमी होण्यासाठी कोणते उपाय सांगितले आहेत. 

अॅसिडीटी आणि गॅसेस हे त्रास अनेकदा आपल्या पाचवीला पुजलेले असतात असं आपण अगदी सहज म्हणून जातो. कधी भूक लागल्यावर खाल्लं नाही तर किंवा कधी भुकेपेक्षा ४ घास जास्त खाल्ले तरी अॅसिडीटी होते. काही वेळा झोप झाली नाही किंवा रुटीनमध्ये काही बदल झाला तर त्याचा परीणाम लगेचच आपल्या पचनसंस्थेवर होतो आणि आपल्याला खूप जास्त प्रमाणात अॅसिडीटी होते. एकदा अॅसिडीटी आणि गॅसेसचा त्रास झाला की आपल्याला काही सुधरत नाही. मग उलट्या, अस्वस्थता, डोकेदुखी यांसारख्या समस्यांमुळे आपण पार हैराण होऊन जातो. अनेकदा अॅसिडीटी झाल्याने छातीत जळजळ होण्याची समस्याही उद्भवते (Easy Home Remedies for Acidity and Gases problems). 

(Image : Google)
(Image : Google)

अशावेळी कोणते उपाय केल्याने आपल्याला आराम मिळेल याबाबत प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी काही सोपे उपाय सांगतात. वेळीच योग्य ते उपाय न केल्यास या समस्या वारंवार उद्भवतात असेही त्या आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हणतात. इन्स्टाग्रामवर अंजली मुखर्जी बऱ्याच अॅक्टीव्ह असून त्या आपल्या फॉलोअर्सना कायम काही ना काही महत्त्वाची माहिती देत आरोग्याबाबत जागरुक करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही बरीच जास्त असून त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही नेटीझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देतात. पाहूयात आता त्यांनी छातीतील जळजळ कमी होण्यासाठी कोणते उपाय सांगितले आहेत. 


१. अर्धा चमचा सोडीअम बायकार्बोनेट पाण्यात मिसळून ते पाणी प्यावे.

२. नारळ पाण्यानेही जळजळ आणि अॅसिडीटी कमी होण्यास मदत होते.

३. कोबीचा ज्यूस हा एक सोपा आणि उत्तम उपाय ठरु शकतो. 

४. कोमट पाण्यात सुंठ पावडर, हिंग आणि काळं मीठ घालून प्यायल्यास त्याचाही चांगला उपयोग होतो. 

५. केळ्यामुळेही अॅसिडीटी किंवा जळजळ कमी होत असल्याने अनेकदा अॅसिडीटी होणाऱ्यांना केळं खाण्याचा सल्ला दिला जातो. 

६. ग्लासभर पाण्यात जीऱ्याची पावडर मिसळून ते पाणी उकळून घ्यावे. 


 

Web Title: Easy Home Remedies for Acidity and Gases problems : Acidity, gas, heartburn? Experts say, 6 simple solutions, you will get relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.