Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > गॅसेसने हैराण आहात? आवर्जून खा किचनमधील ५ पदार्थ, गॅसेसपासून मिळेल आराम...

गॅसेसने हैराण आहात? आवर्जून खा किचनमधील ५ पदार्थ, गॅसेसपासून मिळेल आराम...

Easy Home Remedies for Gases Problem : स्वयंपाकघरातील पदार्थांनी गॅसेसची समस्या दूर होण्यास मदत होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2023 11:53 AM2023-05-01T11:53:12+5:302023-05-01T11:58:33+5:30

Easy Home Remedies for Gases Problem : स्वयंपाकघरातील पदार्थांनी गॅसेसची समस्या दूर होण्यास मदत होते.

Easy Home Remedies for Gases Problem : Troubled by constant gas? Must eat 5 foods in the kitchen, will get relief from gas... | गॅसेसने हैराण आहात? आवर्जून खा किचनमधील ५ पदार्थ, गॅसेसपासून मिळेल आराम...

गॅसेसने हैराण आहात? आवर्जून खा किचनमधील ५ पदार्थ, गॅसेसपासून मिळेल आराम...

गॅसेस ही अशी समस्या आहे की जी कोणाला सांगता येत नाही आणि लपवूनही ठेवता येत नाही. आपल्या आहारात असे काही पदार्थ असतात ज्यामुळे पोट फुगणे, गॅसेस होणे अशा समस्या निर्माण होतात. एकदा गॅसेसचा त्रास सुरू झाला की आपल्याला काही सुधरत नाही. अनेकदा हे गॅसेस शरीराच्या बाहेर न पडता पोटात किंवा छातीत फिरत राहतात आणि मग आपल्याला अस्वस्थ होते आणि पोटात कळा येतात. अशावेळी आपण गॅस ढेकरच्या माध्यमातून बाहेर पडावा यासाठी सोडा किंवा तत्सम पेय घेतो आणि गॅस मोकळा होण्यासाठी प्रयत्न करतो. हवामान बदलल्यानेही अनेकदा गॅसेसची समस्या उद्भवते. योग्य आणि समतोल आहार घेणे, नियमित व्यायाम करणे यांमुळे अपचन किंवा गॅसेसचा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. आपल्या स्वयंपाकघरातही असे काही पदार्थ असतात ज्यांच्या सेवनाने ही गॅसेसची समस्या दूर होण्यास मदत होते. पाहूयात हे पदार्थ कोणते आणि त्यांचा कसा वापर करायचा  (Easy Home Remedies for Gases Problem). 

१. काळे मीठ 

ओवा, जीरे भाजून त्यात थोडे काळे मीठ घातल्यास गॅसेसची समस्या दूर होण्यास मदत होते. जेवण झाल्यावर किंवा पोट जड वाटत असल्यास काळे मीठ आवर्जून खावे. कोमट पाणी आणि काळे मीठ घेतल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. 

(Image : Google)
(Image : Google)

२. आलं 

आलं हा मसाल्याचा एक महत्त्वाचा पदार्थ असून आरोग्यासाठीही त्याचे बरेच फायदे होतात. आलं उष्ण असल्याने जास्त खाऊ नये असे सांगितले जात असले तरी आल्याचा रस किंवा आल्याची गोळी खाल्ल्याने पोटातील गॅस दूर होण्यास मदत होते. जेवणानंतर कोमट पाण्यात लिंबू आणि आलं घातलं तर ते फायदेशीर ठरते. 

३. हिंग 

कोणत्याही पदार्थाची फोडणी करताना आपण त्यात स्वादासाठी हिंगाचा वापर करतो. त्याचबरोबर पोटात गॅसेस फिरत असतील तर कोमट पाण्यात चिमूटभर हिंग घालून प्यावे. पोटाला वरच्या बाजूने हिंग लावल्यास पोटात अडकलेला गॅस दूर होण्यास मदत होते. 

४. ओवा 

पोटाच्या समस्यांसाठी ओवा हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे. ओव्यामध्ये असणाऱ्या थायमॉल या रासायनिक संयुगामुळे पोटातील वायू बाहेर पडण्यास मदत होते. ज्यांना गॅसेसचा त्रास आहे अशांनी कोमट पाण्यासोबत १ चमचा ओवा खायला हवा.

५. जीरे 

फोडणीत आपण आवर्जून जिऱ्याचा वापर करतो. इतकेच नाही तर पदार्थाला चव येण्यासाठी आपण जीरेपूडही घालतो. त्याचप्रमाणे पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठीही जीरे फायदेशीर असते. १ ग्लास पाण्यात जीरे घालून ते पाणी उकळावे आणि मग थंड करुन १-१ घोट प्यावे. यामुळे गॅसेस कमी होण्यास मदत होते.  

Web Title: Easy Home Remedies for Gases Problem : Troubled by constant gas? Must eat 5 foods in the kitchen, will get relief from gas...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.