व्हाईट डिस्चार्ज होणे ही महिलांमधील अतिशय सामान्य समस्या असते. काही वेळा व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल असते पण हा डिस्चार्ज जास्त प्रमाणात झाला तर मात्र ते धोक्याचे लक्षण असू शकते. व्हाईट डिस्चार्जला शास्त्रीय भाषेत ल्युकोरिया (Leucorrhoea) असे म्हणतात. मासिक पाळीच्या काही दिवस आधी ठराविक प्रमाणात व्हाईट डिस्चार्ज होणे नॉर्मल आहे. मात्र पाळीच्या नंतर किंवा एरवीही जास्त प्रमाणात अशाप्रकारचा व्हाईट डिस्चार्ज होत असेल किंवा त्याचा रंग वेगळा असेल, वास येत असेल तर वेळीच योग्य त्या उपाययोजना करायला हव्यात (Easy Home Remedies For White Discharge Problem).
व्हाईट डिस्चार्जमुळे पाठदुखी, मूड स्विंग्ज, कॅल्शियमची कमतरता अशा तक्रारी निर्माण होतात. आता व्हाईट डिस्चार्ज होण्यामागे नेमकी काय कारणं असतात? तर मासिक पाळी सुरु होण्याच्या आधीचा काळ, शरीर संबंधांच्या वेळी उत्तेजना सर्वात जास्त असताना, ताणतणाव असतील तर, यौवन काळात आणि गरोदर असताना अशाप्रकारे अंगावरून पांढरे पाणी जाते. असे झाले तर वेळीच डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यायला हवा. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री व्हाईट डिस्चार्जची समस्या दूर व्हावी यासाठी घरच्या घरी करता येतील असे २ सोपे उपाय सांगतात. हे उपाय नियमितपणे केल्यास त्याचा चांगला होतो.
आयुर्वेदिक उपाय काय
१. अर्धा चमचा आवळा पावडर आणि अर्धा चमचा मध एकत्र करावा आणि हे मिश्रण सकाळी नाश्त्याच्या वेळेला खावे. त्यानंतर पिकलेले केळं खावं. हा उपाय अतिशय सोपा आणि सहज करण्यासारखा असल्याने आपण नक्कीच करु शकतो.
२. आपण भात शिजवतो तेव्हा तांदळात योग्य त्या प्रमाणात पाणी घालतो. मात्र तांदळात नेहमीपेक्षा थोडे जास्त पाणी घालून त्याच्या वर येणारे ग्लासभर पाणी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात घ्यावे. यामुळे व्हाईट डिस्चार्ज कमी होण्यास मदत होते.
हे लक्षात ठेवा
१. हे प्रयोग महिनाभर केल्यास निश्चितच चांगला फायदा होतो.
२. याबरोबरच खूप मसालेदार आणि मीठ असलेले पदार्थ खाणे टाळायला हवे.