Join us   

सर्दी-खोकल्याने हैराण? घरीच करा आजीच्या बटव्यातील खास औषध; सर्दीसाठी रामबाण उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2022 4:50 PM

Easy Home Remedy For Cough and Cold : अगदी झटपट तयार होणारे हे औषध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त ठरु शकते.

ठळक मुद्दे डॉक्टरकडे जाऊन औषधे घेण्यापेक्षा घरच्या घरी करा औषध तयारसर्दी-खोकल्याने वैतागला असाल तर हा सोपा उपाय नक्की करुन पाहा..

थंडी वाढली तसा घरोघरी अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास सुरू झाला. घरात एकाला हे व्हायरल इन्फेक्शन झाले की लगेच सगळ्यांनाच याची लागण होते आणि मग आपण पार हैराण होऊन जातो. सर्दी-कफाने नीट अन्न तर जात नाहीच पण काम करायची ताकदही न राहिल्याने आपल्याला थकवा येऊन जातो. अशावेळी गोळ्या-औषधे घेण्यापेक्षा आजीच्या बटव्यातील काही सोपे उपाय केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हे पारंपरिक औषध कसे करायचे हे आपल्याला माहित असेलच असे नाही. स्मार्टवेदा या इन्स्टाग्राम पेजवर मात्र याविषयी सांगण्यात आले असून अगदी झटपट तयार होणारे हे औषध लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच उपयुक्त ठरु शकते. पाहूयात हे औषध कसं तयार करायचं (Easy Home Remedy For Cough and Cold)...

साहित्य -

१. काळी मिरी - ४ ते ५

२. लवंग - ४ ते ५ 

(Image : Google)

३. दालचिनी - १ इंच तुकडा

४. मध - ३ ते ४ चमचे 

५. हळद - पाव चमचा 

६. काळं मीठ - चिमूटभर

७. आलं- अर्धा चमचा 

कृती -

१. मिरी, लवंग आणि दालचिनी चांगली भाजून त्याची पूड करुन घ्यायची.

२. आलं स्वच्छ धुवून ते बारीक किसून किंवा मिक्सरवर फिरवून घ्यायचे.

३. एका बाऊलमध्ये मध घेऊन त्यामध्ये हळद, काळं मीठ, आल्याची कीस घालून सगळे एकजीव करायचे.

४. यामध्येच मिरी,लवंग आणि दालचिनीची पावडर घालून सगळे चांगले एकजीव करायचे. 

५. सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ही पेस्ट १ चमचा खायची. त्यामुळे सर्दी आणि कफापासून आराम मिळण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडीघरगुती उपायथंडीत त्वचेची काळजी