Join us   

अचानक थंडी वाढल्याने मुलांना सर्दी-खोकला झाला? १ सोपा उपाय, डॉक्टरांकडे न जाता सर्दी होईल बरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2023 2:29 PM

Easy Home Remedy for Cough and Cold in children's : डॉ. निताशा गुप्ता हे औषध कसे तयार करायचे आणि बाळाला कसे द्यायचे याबाबत माहिती देतात.

गेल्या आठवड्यापासून हवाबदल झाल्याने किंवा हवेतील गारठा एकाएकी वाढल्याने सर्दी-खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. एकदा ताप, सर्दी झाली की लहान मुलांना तर काहीच सुधरत नाही. एकतर त्यांचे नाक सतत गळत राहते नाहीतर घट्टसर सर्दी असेल तर नाक चोक अप होते. अशावेळी रात्री झोपेत मुलांना श्वास घेता न आल्याने सतत जाग येत राहते. मुलं असं झालं की रात्रभर कुरकुर करत राहतात त्यामुळे आपलीही नीट झोप होत नाही. रात्रीची नीट झोप झाली नाही की पुढचा संपूर्ण दिवसच खराब जातो (Easy Home Remedy for Cough and Cold in children's) . 

मग ही सर्दी घेण्यासाठी औषधे घेण्याशिवाय अनेकदा पर्याय राहत नाही. पण सतत औषधे घेतल्याने मुलांची प्रतिकारशक्ती कमी होते आणि नैसर्गिकरित्या शरीराची लढण्याची ताकदही कमी होते. त्यामुळे घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून घरीच एक सोपे औषध तयार केल्यास त्यामुळे लहान बाळांची सर्दी बरी होण्यास नक्कीच चांगला उपयोग होतो. डॉ. निताशा गुप्ता हे औषध कसे तयार करायचे आणि बाळाला कसे द्यायचे याबाबत माहिती देतात. 

(Image : Google)

१. साधारण १० ते १२ तुळशीची पानं स्वच्छ धुवून घ्यायची.

२. पाव चमचा आंबेहळद, पाव चमचा सैंधव मीठ घ्यायचे.

 ३. साधारण २ चिमूट लवंगाची पूड आणि पाव चमचा ओवा घ्यायचा. 

४. अर्धा ग्लास पाण्यात हे सगळे घालून गॅस मध्यम आचेवर ठेवून मिश्रण अरर्धे होईपर्यंत चांगले उकळायचे.

     

५. मूल ६ महिने ते १ वर्ष या वयोगटातील असेल तर त्याला दिवसातून ३ वेळा १ चमचा मिश्रण पाजायचे. तर १ ते ३ वर्षाच्या पुढील मुलांना दिवसातून ३ वेळा २-२ चमचे मिश्रण द्यायचे.

६. घरच्या घरी नैसर्गिक घटकांतून तयार केलेले हे औषध लहान मुलांना सर्दी झाल्यावर नक्की ट्राय करुन पाहा.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपालकत्वहोम रेमेडी