Join us   

कोरड्या खोकल्याने मुलं हैराण, रात्रभर झोप नाही? तज्ज्ञ सांगतात १ सोपा उपाय, मिळेल झटपट आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2023 1:22 PM

Easy Home remedy for Dry cough and cold for Childrens : लहान मुलांचा खोकला बराच होत नसेल तर घरच्या घरी करुन पाहा हा सोपा उपाय...

ऑक्टोबर हिट म्हणजे दिवसा उन्हाचा तडाखा आणि रात्री आणि सकाळी गारठा. या विरुद्ध हवामानामुळे या काळात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढते. या काळात होणारा कोरडा खोकला आणि कफ यांमुळे छाती भरल्यासारखी होते. पण हा कफ कोरड्या स्वरुपात असल्याने तो छातीत आणि नाकाच्या आजुबाजूला अडकल्यासारखे होते आणि तो बाहेरही येत नाही. हवेतील बदलामुळे उद्भवणाऱ्या या समस्यांमुळे लहानांपासून मोठेही सगळेच हैराण होऊन जातात. अनेकदा हा खोकला इतका जास्त असतो की खोकून खोकून छाती, बरगड्या, पाठ अक्षरश: दुखून येते. ही समस्या लवकर बरं व्हायचे नाव घेत नाही आणि मग आपण अगदी बेजार होऊन जातो (Easy Home remedy for Dry cough and cold for Childrens). 

(Image : Google )

घरातील एकाला हा संसर्ग झाला की मग हळूहळू सगळ्यांमध्येच तो संसर्ग पसरतो. खोकला झाला असेल तर तो कमी व्हायला बराच वेळ जावा लागतो. डॉक्टरांकडे जाऊन औषधे घेतली तरी काही वेळा या कोरड्या खोकल्यावर आराम मिळत नाही. लहान मुलांना तर अशावेळी घशात इतके इरीटेशन होत असते की ते रात्रीतून सारखे उठतात. त्यामुळे आपली तर झोप होत नाहीच पण मुलांचीही नीट झोप होत नाही. अशावेळी या कोरड्या खोकल्यासाठी वैद्य मिहीर खत्री अतिशय सोपा घरच्या घरी करता येईल असा उपाय सांगतात, पाहूया हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा...

लहान मुलांसाठी उपाय काय ? 

२ वेलची घेऊन त्यातील बियांची बारीक पावडर करायची. यामध्ये अर्धा चमचा खडीसाखर आणि अर्धा चमचा तूप घालून हे मिश्रण चांगले एकत्र करायचे. लहान मुलांना दिवसातून २ ते ३ वेळा हे मिश्रण चाटवायचे. यामुळे लहान मुलांना खोकल्यापासून त्वरीत आराम मिळण्यास मदत होईल. हा खोकला खूपच जास्त प्रमाणात असेल तर या उपायासोबतच आणखी १ उपाय करु शकतो. तो म्हणजे एरंडेल तेलाचे काही थेंब कोमट पाणी किंवा दुधात घालून मुलांना ते प्यायला द्या. यामुळेही कोरड्या खोकल्यावर आराम मिळण्यास मदत होते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सपालकत्व