Join us   

व्हायरल इन्फेक्शन झालं - सर्दी, तापाने हैराण? २ सोपे उपाय, तज्ज्ञ सांगतात व्हायरल इन्फेक्शन असेल तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2023 10:14 AM

Easy Home Remedy for Viral Infection fever Cold and Cough : मोठ्यांसाठी आणि लहानांसाठीही अतिशय उपयुक्त असलेले हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...

हवाबदल झाला की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच आजारी पडतात. पावसाळ्याच्या दिवसांत तर कधी ऊन कधी पाऊस, दमटपणा यांमुळे आजारपणं वाढतात. सर्दी, ताप, खोकला या तर अतिशय सामान्य समस्या. लहान मुलांना तर शाळा, पाळणाघर, वेगवेगळे क्लासेस यांमुळे सतत काही ना काही इन्फेक्शन होत असतं. एकदा इन्फेक्शन झालं की ते बरं व्हायला बरेच दिवस जातात. सुरुवातीला घरगुती उपाय करुन यावर इलाज केला जातो. पण तरीही बरे झाले नाही तर मात्र डॉक्टरांकडे जाऊन औषधं आणली जातात (Easy Home Remedy for Viral Infection fever Cold and Cough) . 

सुटीच्या दिवशी तासंतास उशिरापर्यंत झोपता, आळसात लोळता? हार्टच नाही मेंदूसाठीही ही सवय घातक कारण..

औषधांचा इफेक्ट व्हायलाही ३ ते ५ दिवस लागतात. पण एकदा औषधांची सवय लागली की लागतेच आणि मग औषधं घेतल्याशिवाय फरकही पडत नाही. म्हणून औषधं घ्यायची नाहीत असं नाही पण खूप जास्त नसेल तर घरगुती उपायांनीच बरं करणं जास्त योग्य असतं. ताप, सर्दी किंवा कफ झाला असेल तर मुलं नुसती मलूल असतात, नीट खात नाहीत की खेळत नाहीत. घरात एकाला हे इन्फेक्शन झाले की हळूहळू सगळेच आजारी पडायला लागतात आणि मग सगळं घरंच शांत होतं. प्रसिद्ध डॉ. प्रियांका त्रिवेदी यासाठीच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून अतिशय सोपे उपाय सांगतात. मोठ्यांसाठी आणि लहानांसाठीही अतिशय उपयुक्त असलेले हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...

मोठ्यांचे व्हायरल इन्फेक्शन बरे करायचे तर..

१ ग्लास पाण्यात १० तुळशीची पाने, ५ काळी मिरी आणि ५ लवंग घालायचे. यामध्ये १ चमचा किसलेले आलं घालून हे मिश्रण चांगले उकळून घ्या. हे पाणी अर्धे झाल्यावर त्यामध्ये मध घाला आणि गरम असतानाच प्या. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी मध नाही घातला तीर चालेल. सलग ५ दिवस नियमितपणे दिवसाच्या कोणत्याही वेळेला हा काढा घ्या. त्यामुळे घशाला तर आराम मिळेलच पण प्रतिकारशक्ती वाढण्यासही याची चांगली मदत होईल आणि सततच्या आजारपणापासून दूर राहण्यास याचा चांगला उपयोग होईल.

(Image : Google)

लहान मुलांसाठी काय कराल? 

१ चमचा ओवा घेऊन तो १ वाटी मोहरीच्या तेलात चांगला उकळवा. हे तेल एका बाटलीत भरुन ठेवा आणि त्याने मुलांच्या छातीला, पाठीला, हाताच्या आणि पायाच्या तळव्यांना चांगला मसाज करा. तसेच एका सुती कापडात ओवा घेऊन तो तव्यावर गरम करुन मुलांची छाती, डोकं आणि पाठ शेका. याच्या वासाने कफ आणि सर्दी कमी होण्यास मदत होते. ओवा सर्दी-कफ बरा होण्यासाठी अतिशय उपयुक्त असतो त्यामुळे त्याचा वापर जरुर करायला हवा. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल