Join us   

मायग्रेनच्या त्रासाला वैतागलात? ३ सोपे उपाय, डोकेदुखीपासून मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2023 4:22 PM

Easy Remedy For Headache Migraine Problem : फेस योगा प्रकारात येणारे हे उपाय बसल्या बसल्या १० मिनीटांत करता येतील.

कधी ऑफीसमध्ये काम करताना तर कधी दिवसभरानंतर संध्याकाळी घरी आल्यावर अचानक आपलं डोकं दुखायला लागतं. डोकं दुखणं ही आपल्याला अतिशय सामान्य समस्या वाटते. पण त्यामागे ताणतणाव, अॅसिडीटी यांसारख्या लहान समस्यांबरोबरच मायग्रेन, मेंदूचे विकार किंवा इतरही महत्त्वाची कारणे असू शकतात. मायग्रेन ही तर डोकेदुखीची एक महत्त्वाची समस्या आहे. एकाच बाजुचे डोके यामध्ये ठणकते आणि अक्षरश: आपल्याला काय करावे ते सुचत नाही. कमी झोप, प्रमाणापेक्षा जास्त ताणतणाव, अपुरे पोषण यामुळे मायग्रेनचा त्रास होतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे (Easy Remedy For Headache Migraine Problem).

ही मायग्रेनची डोकेदुखी एकदा सुरू झाली की काय करावे सुधरत नाही. अशावेळी काम सुचत नाही की काहीच सुचत नाही. मग डोकेदुखी कमी होण्यासाठी आपण पेनकिलर घेतो किंवा स्वत:ला रेटत राहतो. अशाने ही समस्या मूळापासून दूर न होता तात्पुरती कमी होते. म्हणूनच मायग्रेनचा त्रास कमी व्हावा यासाठी सहज करता येतील असे काही योग प्रकार आज आपण पाहणार आहोत. फेस योगा प्रकारात येणारे हे उपाय बसल्या बसल्या १० मिनीटांत करता येतील. हे सोपे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया (Easy Remedies for Headaches or Migraine).

१. माईंडफुलनेस पोज

सुखासनात बसून दोन्ही हातांची बोटे डोक्याच्या मध्यभागी ठेवा. आता या बोटांनी डोक्यावर हलके प्रेशर द्या. त्यानंतर ही बोटे खाली घेत डोळे बंद करा. मग पहिल्या बोटाने डोळ्यांच्या बुबुळांना मसाज करा. 

२. इंडेक्स पोज 

सुखासनात बसून हाताचे पहिले बोट कपाळाच्या मध्यभागी ठेवा. आता या पहिल्या बोटाने थोडा दाब द्या. डोळे बंद करुन बोटाने गोलाकार फिरवा. आता याच बोटाने उलट्या दिशेने गेलाकार फिरवा. 

(Image : Google)

३. टॅपिंग

सुखासनात बसा आणि हनुवटी खालच्या दिशेने करा. आता दोन्ही हाताच्या बोटांनी चेहऱ्यावर टॅपिंग करा. यामुळे ताण निघून जाईल आणि रिलॅक्स वाटण्यास मदत होईल. 

याशिवाय...

१. अल्कोहोलपासून दूर राहा. 

२. ताणतणाव मॅनेज करा

३. पुरेशी झोप घ्या

४. मीठ आणि चीज असलेल्या पदार्थांपासून गदूर राहा

५. वातावरणातील बदलांकडे लक्ष द्या

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल