Join us   

सतत अंग दुखते, उत्साहच नाही, थकवा फार? रोज १ पदार्थ खा, सगळ्या तक्रारी गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2024 1:28 PM

easy remedy for Joint pain, Insomnia and tiredness : आहारात न चुकता करा एका पांढऱ्या पदार्थाचा समावेश, मिळेल आराम...

सणावाराची जास्तीची कामं, जागरणं, हवाबदल यामुळे आधीच आपल्याला अंगदुखीचा त्रास होत असतो. बरेचदा इतका थकवा येतो की काहीच करु नये आणि नुसतं पडून राहावं असं वाटत असतं. त्यातच आपली बदलती जीवनशैली यामुळे आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवत असतात. नवनवीन आजार, संसर्ग यामुळे हे त्रास आणि त्याची लक्षणे लहान मुलांपासून, तरुण, ज्येष्ठ मंडळी सगळ्यांमध्येच दिसून येतात (easy remedy for Joint pain, Insomnia and tiredness). 

याशिवाय वाढलेला स्क्रीन टाइम, ताण, उशिरापर्यंत जागरणं यामुळे निद्रनाश व पर्यायाने सतत जाणवणारा थकवा हे सुद्धा सर्वच वयोगटांत आढळून येत आहे. पण या सर्व त्रासांचा परिणाम तुमच्या एकंदरीत आरोग्यावर आणि पर्यायाने उत्पादकतेवर होताना दिसून येते. वैद्य मिहिर खत्री यांनी या सर्व समस्यांवर रामबाण असा उपाय सुचवला आहे. वैद्य म्हणतात, आहारात खसखस नियमितपणे घेतल्यास सांधेदुखी, निद्रनाश आणि थकवा हे त्रास दूर होण्यास मदत होते. पाहूया खसखस कोणत्या प्रकारे आहारात घेऊ शकतो... 

१. खसखसचा काढा 

सांधेदुखीवर हा काढा अत्यंत फायदेशीर ठरतो. यात १५ ग्रॅम म्हणजेच ३ चमचे खसखस ४ कप पाण्यात उकळायची. हे पाणी एक कप उरेल तेव्हा ते गाळून घ्यायचे. त्यात थोडी खडीसाखर घालायची आणि ती विरघळल्यावर हे पाणी प्यायचे. तुम्हाला मधुमेह असेल तर साखर न घालता हे पाणी प्यावे. हे पाणी घेतल्यावर १५-२० मिनिटे काहीही खाऊ पिऊ नये. हा उपाय सकाळी व संध्याकाळी ५,६ वाजता उपाशी पोटी करावा. या उपायाने शरीरात ताकद भरुन येण्यास मदत होते. ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनीदेखील हा उपाय अवश्य करावा.   २. खसखसचे दूध 

ज्यांना निद्रनाशाची समस्या आहे, त्यांनी रात्री झोपण्याआधी एक कप दुधात अर्धा चमचा खसखस घालून दूध चांगले उकळावे. हे दूध गरम असतानाच प्यावे. मधुमेह नसेल तर त्यात आवडीनुसार खडीसाखर घालावी. 

 

  

३. काढ्यामध्ये गूळ

ज्यांना थकवा अधिक जाणवतो त्यांनी वर सांगितलेल्या काढयात गूळ घालून प्यावे. त्यामुळे थकवा दूर होण्यास मदत होते. आपल्याला ज्या प्रकारची समस्या आहे त्याप्रमाणे यातील प्रयोग करावा नक्कीच फायदा होतो. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलघरगुती उपाय