दात हा आपल्या आरोग्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पण आपण त्याकडे पुरेसे लक्ष देत नाही. ऑफीसमध्ये किंवा घरातही आपण सतत काही ना काही खातो नाहीतर चहा किंवा कॉफी पितो. पण ते झाल्यावर आपण तोंड धुतोच असे नाही. अशावेळी खाल्लेल्या अन्नाचे कण दातात राहून ते सडतात आणि दात किडायला सुरुवात होते. सकाळी उठल्यावर आपण सगळे आवर्जून ब्रश करतो. पण रात्री झोपताना मात्र आपण ब्रश करण्याचा कंटाळा करतो. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे कण दातात अडकतात आणि दात किडतात (Easy Remedy for Teeth Whitening at Home).
एकदा दातांचे दुखणे सुरू झाले की आपल्याला काहीच सुधरत नाही. कारण दातांचे दुखणे अनेकदा सहन न होणारे असते. तसेच यासाठी खर्चही बराच येत असल्याने दात स्वच्छ ठेवणे केव्हाही चांगले. अनेकदा आपण दात घासतो पण तरी ते पिवळे दिसतात. दातांमध्ये अडकलेले अन्नाचे कण नीट निघत नाहीत, काही वेळा तोंडाचा वासही येतो. मात्र आपले दात जाहिरातीतल्या अभिनेत्रींप्रमाणे पांढरेशुभ्र असावेत असे सगळ्यांनाच वाटते. आता त्यासाठी काय करायचं असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर आज आपण दात पांढरेशुभ्र दिसावेत यासाठी करता येईल अशी सोपी ट्रिक पाहणार आहोत. इन्स्टाग्रामवर anubeauty.tips या पेजवर ही ट्रीक शेअर करण्यात आली असून दात पांढरेशुभ्र दिसावेत म्हणून काय करायचे पाहूया...
पाहूया काय आहे ट्रीक
एका डीशमध्ये आल्याचा रस घ्या, त्यामध्ये मीठ घाला. आपण नियमितपणे वापरत असलेली पेस्ट यामध्ये घाला आणि हे मिश्रण चांगले एकजीव करा. ब्रशवर हे मिश्रण लावून दात घासा. दररोज हे करायला वेळ नसेल तरी आठवड्यातून २ वेळा तरी हे आवर्जून करा. दात चमकण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. तसेच नैसर्गिक घटकांचा वापर केल्याने इतर कोणताही त्रास होण्याची शक्यता नसल्याने हा अगदी सोपा आणि चांगला उपाय आहे.