Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कमी वयात चष्मा लागला? सकाळी १ काम करा-नजर होईल तेज आणि डोळ्यांची वाढेल ताकद

कमी वयात चष्मा लागला? सकाळी १ काम करा-नजर होईल तेज आणि डोळ्यांची वाढेल ताकद

Easy Ways to Get Rid Of Spectacles : कमी वयातच लोकांना मोठ्या नंबरचे चष्मे लावावे लागतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 12:45 PM2024-08-25T12:45:01+5:302024-08-26T16:46:16+5:30

Easy Ways to Get Rid Of Spectacles : कमी वयातच लोकांना मोठ्या नंबरचे चष्मे लावावे लागतात.

Easy Ways to Get Rid Of Spectacles : According to Experts These Morning Routine Will Help You Get Rid Of Spectacles | कमी वयात चष्मा लागला? सकाळी १ काम करा-नजर होईल तेज आणि डोळ्यांची वाढेल ताकद

कमी वयात चष्मा लागला? सकाळी १ काम करा-नजर होईल तेज आणि डोळ्यांची वाढेल ताकद

आजकालच्या जीवनशैलीत डोळ्यांना चष्मा लागणं हे खूपच कॉमन झालं आहे.  सतत मोबाईल स्क्रीन पाहणं,  टिव्हीसमोर बसणं, तासनतास लॅपटॉवर काम करणं यामुळे चष्मा लागण्याचं प्रमाण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांमध्येच वाढले आहे. (Eye Care Tips) कमी वयातच लोकांना मोठ्या नंबरचे चष्मे लावावे लागतात.  (How To Remove Spectacled Permanently) इच्छा नसतानाही चष्मा लावावा लागतो कारण त्याशिवाय  कोणतीही गोष्ट व्यवस्थित दिसत नाही, ना काही वाचता येत. ((How to Improve Eyesight) आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल केला आणि काही सहज जमतील असे घरगुती उपाय ट्राय केले तर तुम्हाला चष्मा लागण्याचा त्रासच उद्भवणार नाही.(According to Experts These Morning Routine Will Help You Get Rid Of Spectacles)

सेंटर फॉर साईट(इव्हरी आय डिजर्व्ह द बेस्ट) च्या रिपोर्टनुसार चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी तुम्हाला ७ बदाम, ५ ग्राम बडिशेप,  ५ ग्रॅम खडीसाखर याची पावडर करून ठेवा. रोज एक चमचा चुर्ण थंड दुधासोबत घ्या. या पावडरचे दुधासोबत नियमित सेवन केल्यानं दृष्टी सुधारण्यास मदत होते. ज्यामुळे चष्म्याची आवश्यकता हळूहळू कमी होते (Ref). डोळे क्लॉकवाईज आणि एंटीक्लॉकवाईज अशा डायरेक्शनमध्ये फिरवा ज्यामुळे डोळ्यांचा व्यायाम होईल. डोळ्यांची नियमित मसाज करायला हवी. या उपायांनी तुमच्या डोळ्यांचे आरोग्य सुधारत असले तरी चष्मा कायमचा हटवण्यासाठी सर्जरी हा एकमेव उपाय आहे. हायपरोपिया, प्रिसबायोपिया  या ट्रिटमेंट्स डोळ्यांसाठी अत्यंत  सुरक्षित आहेत. डॉक्टरांच्या सल्लानुसार तुम्ही या ट्रिटमेंट्स घेऊ शकता. 

नेत्ररोग विशेषज्ञ डॉ. अरविंद कुमार सांगतात की रोज सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालल्यास चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.  गवतावर चालण्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो, ज्यामुळे दृष्टी चांगली राहण्यासही मदत होते. याचे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत पण  चालण्याचा डोळ्यांना फायदा होतो असं अनेक रुग्णांमध्ये दिसून येतं.

डोळे चांगले ठेवण्यासाठी  बाहेर जाताना डोळे सनग्लासेसनं कव्हर करा, डोळे धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. व्हिटामीन ए युक्त फळं भाज्या, गाजर, पपई यांचा आहारात समावेश करा. सकाळी उठल्यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासून  डोळ्यांना लावा त्यानंतर डोळे उघडा. या सर्व उपायांनी चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होईल.

Web Title: Easy Ways to Get Rid Of Spectacles : According to Experts These Morning Routine Will Help You Get Rid Of Spectacles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.