थोडं काम केलं की लगेच थकवा येतो, झोप लागते, शरीराला आरामच मिळत नाही अशी अनेकांची तक्रार असते. तुम्हालाही सतत थकवा येत असेल तर याची अनेक कारणं असू शकतात. (Health Tips) आहारातज्ज्ञ श्वेता पांचळ यांनी शारीरिक कमजोरी, थकवा यामगे व्हिटामीन बी-१३, बी३ ची कमतरता, ताण-तणाव, लठ्ठपणा ही ३ कारणं असल्याचे सांगितले आहे. (Health Tips)
डॉक्टरांचा सल्ला आहे की थकव्यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बी१२ किंवा बी३ च्या सप्लिमेंट्स घेऊ शकता. थकवा आणि कमकुवतपणा दूर करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय फायदेशीर ठरतील. (Eat 10 Vitamin B3 And B-12 Rich Foods To Get Rid Of Weakness And Tiredness Naturally)
चीझ, दही हे पदार्थ व्हिटामीन्सचा चांगला स्त्रोत आहेत. व्हिटामीन बी १२, कॅल्शियम आणि प्रोटीन्स असे तिन्ही घटक यातून मिळतात. याशिवाय ब्रोकोली तिच्यातील पोषक तत्वांमुळे महत्वाची मानली जाते. बोकोलीत व्हिटामीन्स, मिनरल्स भरपूर असतात. ज्यामुळे कॅल्शियमची कमतरता दूर होते.
नियमित ड्रायफ्रुट्सचे सेवन करा, व्हिटामीन बी १२ ची कमतरता दूर करण्यासाठी बदामाचे अधिकाधिक सेवन करायला हवे. बदाम एक नट आहे. ज्यात व्हिटामीन बी व्यतिरिक्त प्रोटीन, कॅल्शियम, आयर्न आणि इतर मिनरल्स असतात. आपल्या आहारात फळं, टोमॅटो, टोफू, स्प्राऊट्स, मशरूममध्ये व्हिटामीन बी-१२ भरपूर प्रमाणात असते.
व्हिटामीन बी-१२ ने परिपूर्ण खाद्यपदार्थांचे सेवन
व्हिटामीन बी-१२ शरीरासाठी महत्वाचे असते. यामुळे हाडांपासून मसल्सपर्यंत सर्व अवयवांना ताकद मिळते. यासाटी तुम्ही लीन मीट, बीन्स, मटार, डाळी, नट्स, सि्डस, सोया उत्पादनांचा आहारात समावेश करू शकता.
व्हिटामीन बी-३ युक्त पदार्थ खा
व्हिटामीन बी३ ला नियासिन असेही म्हटले जाते. शरीरातील पोषक तत्वांची कमतरता, थकवा, कमकुवतपणा दूर होतो. याची कमतरता पूर्ण करण्यासाठी प्रोटीन्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.
प्रोटीनसाठी महागड्या गोेष्टी परवडत नाहीत? फक्त १० रुपयांत खा ३ प्रोटीन पदार्थ- हाडं होतील बळकट
ताण-तणाव घेऊ नका
जास्त ताण-तणाव घेतल्यास याचा तुमच्या शारीरिक मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. हे टाळण्यासाठी नियमित व्यायाम करा, पौष्टीक आहार घ्या, चांगली झोप घ्या, ताण-तणाव कमी करण्यासाठी आपल्या कुटुंबातील लोकांशी बोला.
चपात्यांचे काठ वातड होतात-नीट फुगत नाही? पीठ मळताना 'हा' पदार्थ मिसळा, मऊ होतील चपात्या
लठ्ठपणा सध्याच्या स्थितीतील एक मोठी समस्या बनले आहे. लठ्ठपणा अनेक आरोग्यासंबंधित समस्यांचे कारण ठरू शकतो. हदयरोग, लठ्ठपणा, डायबिटीस यांसारखे आजार यामुळे उद्भवतात. यासाठी हेल्दी डाएट घ्या, रोज व्यायाम करा, ७ ते ८ तासांची झोप घ्या, ताण-तणाव कमी घ्या.