Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा ८ भाज्या, आयुष मंत्रालयाने शेअर केली लिस्ट

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा ८ भाज्या, आयुष मंत्रालयाने शेअर केली लिस्ट

Eat 8 vegetables to boost immunity in winter, Ministry of AYUSH shared list : थंडीच्या महिन्यात फ्लू, ताप, खोकला, सर्दीचा त्रास होऊ नये म्हणून खा ८ भाज्या, तब्येत सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2023 02:58 PM2023-10-30T14:58:49+5:302023-10-30T15:00:13+5:30

Eat 8 vegetables to boost immunity in winter, Ministry of AYUSH shared list : थंडीच्या महिन्यात फ्लू, ताप, खोकला, सर्दीचा त्रास होऊ नये म्हणून खा ८ भाज्या, तब्येत सांभाळा

Eat 8 vegetables to boost immunity in winter, Ministry of AYUSH shared list | हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा ८ भाज्या, आयुष मंत्रालयाने शेअर केली लिस्ट

हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खा ८ भाज्या, आयुष मंत्रालयाने शेअर केली लिस्ट

दसरा या सणानंतर खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होते. गुलाबी थंडी हवीहवीशी वाटते खरी, पण या दिवसात आपण आजारी देखील पडतो. थंडीच्या दिवसात प्रतिकारशक्ती कमकुवत होते. अशावेळी संसर्गामुळे एखादी व्यक्ती सहजपणे आजारी पडू शकते. या दिवसात रोगप्रतिकारशक्ती वाढविणारा आहार घेतल्याने फ्लू, ताप, खोकला, सर्दीसारखा त्रास होत नाही.

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने त्यांच्या ट्विटर अकांऊटवर, हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांची लिस्ट शेअर केली आहे. त्यात परवळ, दुधी भोपळा, कारले, रताळे, बीटरूट, मुळा, गाजर यासह इतर भाज्यांचा समावेश आहे(Eat 8 vegetables to boost immunity in winter, Ministry of AYUSH shared list).

हिवाळ्यात कोणत्या भाज्या खाणं फायद्याचं?

परवळ

परवळमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, पोटॅशियम, कॉपर, डायटरी फायबर यासह इतर गुणधर्म आढळतात. ज्यामुळे पचन सुधारते. यासह मेंदूची क्षमता आणि प्रतिकारशक्ती वाढते.

जायफळ घालून दूध पिण्याचे ४ फायदे, स्ट्रेस होईल कमी - ' असे ' करा जायफळ दूध

दुधी भोपळा

दुधी भोपळा आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. आहारात दुधी भोपळ्याचा समावेश केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. यात परवळप्रमाणे कॅलरीजचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन वाढत नाही. शिवाय दुधी भोपळा खाल्ल्याने यकृत निरोगी व उच्च रक्तदाबाचा त्रास होत नाही.

कारलं

कारले हे एक अँटी-डायबेटिक फूड आहे. नियमित कारलं खाल्ल्याने खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि रक्त शुद्ध होते. हे पोट, त्वचा, केस आणि दृष्टी सुधारण्याचे काम करते.

रताळे आणि मुळा

रताळे आणि मुळा हे दोन्ही भाज्या हिवाळ्यात खाल्ल्या जातात. यामध्ये अनेक मॅक्रो आणि मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात. रताळे व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी ५, मॅंगनीज, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फोलेट प्रदान करते, तर मुळ्याच्या सेवनाने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, पचनाचा त्रास, फंगल इन्फेक्शन यापासून आराम मिळतो.

बॅड कोलेस्टेरॉलमुळे नसा ब्लॉक झाल्या? रोज खा ५ पदार्थ, हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम

गाजर आणि बीटरूट

गाजारातील पौष्टीक गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या दिवसात नियमित गाजर खाल्ल्याने दृष्टी तीक्ष्ण होते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढते. बीटरूट फोलेट आणि सेल फंक्शन वाढवण्यास मदत करते. त्यामुळे हिवाळ्यात गाजर बीटरूट नक्की खा.

Web Title: Eat 8 vegetables to boost immunity in winter, Ministry of AYUSH shared list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.