Join us   

रोजच्या आहारात 5 गोष्टी खूप खाता? सावधान, तुमची हाडं ठिसूळ होतील; ठणकतील..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2022 7:43 PM

Bone pain : हाडे चांगली तर शरीर चांगले राहू शकेल, पण हाडेच ठिसूळ असतील तर आरोग्याच्या इतरही बऱ्याच तक्रारी उद्भवतात...

ठळक मुद्दे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर हाडे दणकट ठेवायला हवीतआहारातील छोटे बदल वाचवतील हाडांचे आरोग्य

हाडांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी शरीरात कॅल्शियम (calcium) , डी व्हिटॅमिन (D Vitamin) , लोह ( Iorn) यांसारख्या घटकांची आवश्यकता असते. पण हे घटक योग्य प्रमाणात नसतील तर हाडे ठणकणे (Bone pain) , कमकुवत होणे यांसारख्या समस्या उद्भवतात. आपले संपूर्ण शरीर हा़डांवर उभे असल्याने हाडे चांगली तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. पण हाडेच कमजोर असतील तर संपूर्ण शरीरावर त्याचा परीणाम होतो. शरीराला आकार देण्याबरोबरच शरीराची इतरही अनेक कामे हाडे पार पाडत असतात. आपला जन्म होतो तेव्हा शरीरात २७० हाडे असतात. पण आपण मोठे होते तसे या हाडांची संख्या कमी होते आणि शरीरात केवळ २०६ हाडे शिल्लक राहतात. त्यामुळे या राहीलेल्या हाडांचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन आवश्यक असून त्याचे प्रमाण कमी झाल्यास ऑस्टीओपोरॅसिस (Osteoporosis) म्हणजेच हाडांचा ठिसूळपणा उद्भवतो. पण आपल्या आहारात नियमित असलेल्या काही घटकांमुळे हाडे कमकुवत होतात आणि ते आपल्याला माहितही नसते. त्यामुळे आहारातील असे कोणते घटक आहेत जे हाडांसाठी घातक ठरु शकतात पाहूया...

सोडीयम असणारे पदार्थ

आपण जितके जास्त मीठ खातो तितका आपल्या हाडांतील कॅल्शियम कमी होतो. न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात करण्यात आलेल्या एका अभ्यासावरुन हे सिद्ध झाले आहे की मीठामुळे किडणीच्या माध्यमातून कॅल्शियम शरीरातून बाहेर पडते आणि हाडांना ते कमी प्रमाणात मिळते. त्यामुळे तज्ज्ञ कायमच मीठाचे कमी प्रमाणत सेवन करण्याचा सल्ला देतात. त्यांच्या म्हणण्यानुसार रोज केवळ २३०० मिलीग्रॅमपेक्षा कमी मीठ खायला हवे. 

(Image : Google)

गोड पदार्थ 

जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाणे केवळ हाडांसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी घातक असते. गोड खाणे आणि हाडांच्या आरोग्याचा थेट संबंध नसला तरी जेव्हा लोक गोड जास्त खातात तेव्हा ते जेवण कमी करतात. त्यामुळे त्यांच्या हाडांचे पुरेसे पोषण होत नाही आणि हाडे कमकुवत होतात. 

(Image : Google)

सोडा 

सध्या वेगवेगळ्या प्रकारच्या फूड चेनमध्ये विशिष्ट पदार्थांसोबत सोडा दिला जातो. मात्र थंडपेयांमध्ये असणारा हा सोडा आरोग्यासाठी अतिशय घातक असतो. अनेकदा जंकफूडमध्येही सोड्याचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला असतो. असे पदार्थ सातत्याने खाल्ल्यास किंवा प्यायल्यास हाडे कमकुवत होतात आणि महिलांमध्ये मेनोपॉजनंतर हाडे तुटण्याची समस्या उद्भवते. म्हणून सोडा पिणे किंवा सोडा असलेले पदार्थ खाणे टाळायला हवे. 

(Image : Google)

कॅफेन 

कॅफेनमुळे महिलांच्या हाडांची घनता कमी होते. सध्या थंडीमुळे किंवा एरवीही अनेकांना सतत कॉफी प्यायची सवय असते. मात्र त्यामुळे हाडे कमकुवत होतात आणि कमी वयातच हाडांच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे तुम्हालाही सतत कॉफी प्यायची सवय असेल तर वेळीच ही सवय मोडा नाहीतर तुम्हालाही हाडांच्या समस्या उद्भवतील. 

(Image : Google)

मद्यपान 

नियमित मद्यपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये हाडांच्या तक्रारी सर्रास दिसून येतात. हल्ली महिलांमध्येही मद्यपान करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पुरुषांच्या बरोबरीने महिलांमध्येही हाडे ठिसूळ होण्याच्या तक्रारी उद्भवतात. मद्यपान आरोग्याच्या इतर तक्रारींसाठी ज्याप्रमाणे अपायकारक असते तसेच ते हाडांसाठीही घातक असते. म्हणून मद्यपान टाळलेले केव्हाही चांगले. 

(Image : Google)
 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजनालाइफस्टाइल