भारतीय थाळी चटणी चटण्यांशिवाय अपूर्ण आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आहारात चटण्यांचा (Chutney) समावेश असणं फार महत्वाचे आहे. (Health Tips) अनेकांना जेवताना भाजी नसेल तरी चालतं पण जेवणाच्या ताटात चटणी असायलाच हवी. चटण्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (How to Make Flax Seed Chutney Recipe) या चटणीचे सेवन तुम्ही चाट किंवा भजीबरोबर करू शकता. टोमॅटोची चटणी, पुदिन्याची चटणी तुम्ही अनेकदा खाल्ली असेल पण आळशीची चटणीही तितकीच गुणकारी आणि चवीला उत्तम असते. (Flaxseed Chutney Benefits)
ही चटणी फक्त चवीला उत्तम नाही तर पोषणाच्या बाबतीतही उत्तम आहे. हेल्दी फॅट्स, एंटी ऑक्सिडेंट्स, फायबर्सचा एक चांगला स्त्रोत आहे. आहारतज्ज्ञ जुही कपूर यांनी आळशीची चटणी करण्याची सोपी रेसिपी शेअर केली आहे. आळशीची चटणी करण्याची सोपी पद्धत पाहूया. (Flax seeds For Cholesterol and Blood Pressure Control)
आळशीची चटणी खाण्याचे फायदे (Flax seeds Eating Benefits)
या चटणीत प्रोटीन, लिगनेल आणि महत्वाचे फॅटी एसिड्स, अल्फा लिनोलेनिक एसिड असते. ज्याला ओमेगा-३ रूपातही ओळखले जाते. वाटलेल्या आळशीच्या बियांचे सेवन केल्यानं शरीराशला बरीच पोषक तत्व मिळतात. सुंदर त्वचा आणि केसांसाठी ही चटणी फायदेशीर ठरते. तुम्ही रोजच्या आहारात या चटणीचा समावेश केला तर ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासही मदत होईल.
रात्री किचनमध्ये खूप बारीक झुरळं होतात? ५ छोटी रोपं घरात ठेवा; झुरळं आसपासही दिसणार नाही
मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर
असं मानलं जातं की आळशीच्या बियांतील बायोएक्टिव्ह गुणांमुळे एंटी ऑक्सिडेंट्स, एंटि इफ्लेमेटरी आणि एंटी कॅन्सर गुण असतात. जे हृदय, लिव्हर आणि केसांच्या आरोग्यासाठी हेल्दी मानले जातात.
आळशीची चटणी कशी करायची? (How to Make Flax seeds Chutney)
1) भाजलेल्या आळशीच्या बीया- १५० ग्राम
2) तिळाच्या बिया-१०० ग्राम
3) शेंगदाणे- ५० ग्राम
4) लसणाच्या पाकळ्या- २०
5) लाल मिरच्या- ४ ते ५
6) मीठ- १ चमचा
7) जीरं- १ चमचा
आळशीची चटणी करण्याची कृती (Alshi Chi chutney making process)
१) सगळ्यात आधी सर्व वरील साहित्य व्यवस्थित भाजून घ्या. भाजलेलं साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. तुम्ही यात दाण्याचे कुटही घालू शकता.
पोट खूप सुटलंय-धड व्यायामही होत नाही? रोज रिकाम्या पोटी हा पदार्थ घ्या-पोट होईल स्लिम
2) हे मिश्रण एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून करून ठेवू शकता. तुम्हाला जेव्हाही खावीशी वाटेल तेव्हा डबा उघडा आणि या चटणीचे सेवन करा.
3) चपाती किंवा भाकरीबरोबर याशिवाय भाताबरोबर, खिचडीसह तुम्ही या चटणीचे सेवन करू शकता.