Join us   

रोज उशिरा जेवता? ५ गंभीर आजारांचा धोका, कामातही लागणार नाही लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2022 11:50 AM

Late Lunch रोज - रोज उशिरा जेवणाची सवय लागली, ही सवय ठरेल शरीरासाठी घातक

आजकालच्या धावपळीच्या जीवनात सकस आहाराचे सेवन आणि वेळेवर जेवण करणे होत नाही. अनेकांना वेळेवर न जेवणाची सवयी लागते. याचा थेट परिणाम आपल्या शरीरावर होतो. या कारणामुळे आपण आपल्या शरीरात अनेक आजारांना निमंत्रित करतो. निरोगी राहण्यासाठी केवळ सकस आहार घेणे आवश्यक नाही तर ते योग्य वेळी खाणे देखील खुप आवश्यक आहे. दुपारचे जेवण उशिरा केल्यानंतर, अनेक घातक आजार आपल्या शरीरात उद्भवू शकतात. या गोष्टीचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो, कोणते समस्या उद्भवू शकतात, याबदल आपण जाणून घेणार आहोत.

अन्न नीट पचत नाही

कामाच्या गडबडीत किंवा इतर कारणांमुळे जेव्हा दुपारचे जेवण उशिरा होते, तेव्हा पचनसंस्था नीट काम करत नाही. आयुर्वेदानुसार, व्यक्तीने दुपारी 12 ते 2 या वेळेत जेवण केले पाहिजे. यावेळी, तुमच्या शरीरात पित्ताचे प्राबल्य असते, जे अन्न पचण्यास खूप मदत करते. अशा स्थितीत जेवण उशिरा केल्यास त्यातून ऊर्जा मिळण्याऐवजी अन्नाचे रूपांतर चरबीत होते. आणि ही गोष्ट आपल्या शरीरासाठी घातक आहे.

मेटाबॉलिज्म

दुपारचे जेवण उशिरा केल्याने व्यक्तीची चयापचय क्रिया मंदावते. जर न्याहारी करून थेट दुपारचे जेवण केले आणि तेही वेळेवर केले नाही तर चयापचय हळूहळू मंदावते. त्यामुळे झपाट्याने वजन वाढते.

डोकेदुखी किंवा चिडचिड

जेवण वेळेवर न घेतल्यास डोकेदुखी किंवा चिडचिड होऊ शकते. त्याच वेळी, कामात लक्ष केंद्रित करण्यास देखील त्रास होतो आणि काम करावेसेही वाटत नाही. 

एनर्जीची कमी जाणवते

अन्न हे आपल्या शरीरासाठी उर्जेचा मुख्य स्त्रोत आहे, परंतु जेव्हा आपण दुपारचे जेवण उशिरा जेवतो तेव्हा शरीरात पुरेशी ऊर्जा निर्माण होत नाही. यामुळे दिवसभरात खूप ऊर्जा कमी झाल्यासारखे वाटते. आणि कामात लक्ष लागत नाही.

गॅस, जळजळ, निद्रानाश

जेव्हा आपण दुपारचे जेवण उशिरा करतो. तेव्हा आपले पोट भरलेले राहते. त्यामुळे आपण रात्रीचे जेवणही उशिरा करतो. अशा परिस्थितीत जर तुम्ही झोपायच्या आधी खाल्ले तर तुम्हाला पोटात जळजळ, गॅस, निद्रानाश अशा समस्या उद्भवतात.

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइल