Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जेवणानंतर रोज खा बडीशेप, फायदेच फायदे! बडीशेपेचे गुण, तब्येतीला मस्त सुकुन..

जेवणानंतर रोज खा बडीशेप, फायदेच फायदे! बडीशेपेचे गुण, तब्येतीला मस्त सुकुन..

बडीशेप हा केवळ मसाल्याचा पदार्थ किंवा मुखवास म्हणून नाही, तर आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी बडीशेप खाणे फायदेशीर ठरते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 05:58 PM2021-11-23T17:58:10+5:302021-11-23T18:11:06+5:30

बडीशेप हा केवळ मसाल्याचा पदार्थ किंवा मुखवास म्हणून नाही, तर आरोग्याच्या विविध तक्रारींसाठी बडीशेप खाणे फायदेशीर ठरते.

Eat Saunf fennel seeds every day after meal, only benefits! The virtues of fennel, very good for health .. | जेवणानंतर रोज खा बडीशेप, फायदेच फायदे! बडीशेपेचे गुण, तब्येतीला मस्त सुकुन..

जेवणानंतर रोज खा बडीशेप, फायदेच फायदे! बडीशेपेचे गुण, तब्येतीला मस्त सुकुन..

Highlightsमुखवास म्हणूनच नाही तर आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून बडीशेप रोज खायला हवी बडीशेपचे भन्नाट फायदे जाणून घ्या

जेवण झाल्यावर अगदी हमखास खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे बडीशेप. अनेकांना तर चहा-कॉफी घेतल्यावरही बडीशेप खाण्याची सवय असते. आता मुखवास म्हणून खाल्ली जाणारी या बडीशेपमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत हे आपल्यातील अनेकांना कदाचित माहित नसेल. शरीरासाठी आवश्यक असणारे क जीवनसत्व, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि आयर्न असे अनेक घटक बडीशेपमध्ये असतात. त्यामुळे जेवणानंतर न चुकता बडीशेप खायला हवी. असे असले तरी ती योग्य त्या प्रमाणातच खायला हवी, फायदेशीर असते म्हणून बेसुमार खाल्ली तर ते आरोग्यासाठी हानिकारकही ठरु शकते. बडीशेप हा मसाल्याचा एक पदार्थ असून पदार्थांना स्वाद येण्यासाठीही त्याचा उपयोग केला जातो. पाहूयात हीच बडीशेप तब्येतीसाठी कशी फायदेशीर ठरते ते...

१. अपचन व मळमळ यावर उपयुक्त - अनेकांना जळजळीत खाल्ले किंवा प्रवासात जेवण झाल्यावर मळमळ आणि करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. काहींना अजीर्ण झाल्यासारखे होते. अशावेळी बडीशेप खाल्ल्यास हा त्रास काही प्रमाणात कमी होऊ शकतो. तसेच अशा लोकांनी नियमीतपणे जेवण झाल्यावर थोडी बडीशेप खायला हवी म्हणजे हा त्रास कालांतराने बंद होतो. 

(Image : Google)
(Image : Google)

२. रक्तशुद्धीसाठी फायदेशीर - बडीशेप ही मुखवास म्हणून ज्याप्रमाणे उपयुक्त असते त्याचप्रमाणे शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण होण्यासाठीही ती फायद्याची ठरते. शरीराची क्रिया चांगली होण्यासाठी रक्तशुद्धी होणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका टळू शकतो. रात्रभर पाण्यात बडीशेप भिजत ठेवली आणि सकाळी उठल्यावर अनोशापोटी हे पाणी प्यायले तरी रक्तशुद्धी होण्यास मदत होते. 

३. त्वचेच्या तक्रारी दूर होण्यास मदत - अनेक तरुणींना वेगवेगळ्या कारणांनी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. तसेच पुटकुळ्याही येतात. मात्र दररोज बडीशेप खाल्ल्यास ही समस्या कमी होण्यास मदत होते. बडीशेपमधील घटक आरोग्यासाठी फायदेशीर असल्याने चेहऱ्यावर येणारे पिंपल्स दूर होण्यास मदत होते. शरीरातील हॉर्मोन्सची पातळी चांगली ठेवण्यासाठी तसेच त्वचा थंड ठेवण्यासाठी झिंक, कॅल्शियम आणि सेलेनियम हे बडीशेपमधील घटक परिणामकारक असतात.

(Image : Google)
(Image : Google)

४. वजन कमी होण्यास मदत - बडीशेपमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस चयापचयाच्या क्रियेत मदत करतात. त्यामुळे शरीरातील अतिरीक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि नकळत वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठ व्यक्तींनी ब़डीशेप आवर्जून खायला हवी. 

५. हृदयरोगावर उपयुक्त - बडीशेपमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयरोगाची समस्या टळण्यास मदत होते. बडीशेपमधील पोटॅशियममुळे शरीरातील फोलेटचे प्रमाण कमी होते आणि उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते. 
 

Web Title: Eat Saunf fennel seeds every day after meal, only benefits! The virtues of fennel, very good for health ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.