Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > कितीही खा पण वजन वाढतच नाही? रोज ५ पदार्थ खा; वजन वाढेल-लुकडं शरीर होईल फिट-मेटेंन

कितीही खा पण वजन वाढतच नाही? रोज ५ पदार्थ खा; वजन वाढेल-लुकडं शरीर होईल फिट-मेटेंन

Eat These 5 High Protein Rich Dairy Products To Gain Weight : प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे त्वचा, केस, नखं कमकुवत होऊ शकतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 05:29 PM2024-02-15T17:29:26+5:302024-02-15T17:33:15+5:30

Eat These 5 High Protein Rich Dairy Products To Gain Weight : प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे त्वचा, केस, नखं कमकुवत होऊ शकतात.

Eat These 5 High Protein Rich Dairy Products To Gain Weight And Make Your Muscles Bone Strong | कितीही खा पण वजन वाढतच नाही? रोज ५ पदार्थ खा; वजन वाढेल-लुकडं शरीर होईल फिट-मेटेंन

कितीही खा पण वजन वाढतच नाही? रोज ५ पदार्थ खा; वजन वाढेल-लुकडं शरीर होईल फिट-मेटेंन

शरीरात पोषक तत्वांची कमतरता भरून काढण्यासाठी प्रोटीन्स आवश्यक असतात. प्रोटीन्सच्या  सेवनाने मसल्सची ग्रोथ होते. शरीराच्या वेगवेगळ्या भागांत हॉर्मोन्स, एंजाईम्स तयार होता. प्रोटीन्सच्या नियमित सेवनाने मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. (Health Tips) प्रोटीन्स शरीराला आजारांशी लढण्यास मदत करते.  प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे हाडं कमकुवत होतात. (How to Gain Weight) पोट, मांड्या, पायांमध्ये पाणी जमा होतं. याला एडिमा असंही म्हणतात. प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे त्वचा, केस, नखं कमकुवत होऊ शकतात. (Eat These 5 High Protein Rich Dairy Products To Gain Weight)

योग्य प्रमाणात प्रोटीन्सचे सेवन केल्यास थकवा, कमकुवतपणा येणं, इम्यून  सिस्टिम  कमकुवत होणं अशी लक्षणं जाणवतात. हॉर्मोनल संतुलन बिघडू शकते आणि मांसपेशी कमकुवत होतात. एनसीबीआयच्या रिपोर्टनुसार फक्त नॉनव्हेज नाही तर काही व्हेज पदार्थसुद्धा प्रोटीन्सच चांगला स्त्रोत आहेत.(Ref)  जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर काही पदार्थांचे  रोजच्या आहारात सेवन करू प्रोटीन्सची कमतरता भरून काढू शकता. 

दही

योगर्टमध्ये चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. प्रति औंसमध्ये जवळपास १२ ग्राम प्रोटीन असते. यामुळे ग्रीक योगर्टचे सेवन करायलाच हवे. याच्या सेवनाने फक्त  मसल्स चांगले राहत नाही तर वजन वाढण्याही मदत होते. याशिवाय हाडांचे आरोग्य चांगले राहते. यात कॅल्शियमचे प्रमाणही चांगले असते. 

केस पातळ झालेत? चमचाभर कॉफीचा खास शाम्पू लावा; केस गळती कमी, केस होतील सिल्की-दाट

कॉटेज चिझ

कॉटेज चिझमध्ये जवळपास  १०० ग्राम ११ ग्राम प्रोटीन असते. कॉटेज चिझ प्रोटीन्सचा एक उत्तमस्त्रोत आहे. जो लोक नॉनव्हेज खात नाही किंवा जे व्हेजिटेरियन लोक वेगन डाएट घेतात त्यांनी आपल्या आहारात  प्रोटीन्सबरोबरच व्हिटामीन  डी, कॅल्शियम, फॉस्फरेस आणि अन्य पोषक तत्वांचा समावेश करावा. ज्यामुळे हाडं चांगली राहतात आणि मांसपेशींचा विकास चांगला होतो. 

पोट सुटलंय-मांड्या मोठ्या दिसतात? १० रूपयांच्या कढीपत्त्याचा १ उपाय; झरझर वजन कमी होईल

दूध

दुधात प्रति १०० ग्राममध्ये ३.४ ग्राम प्रोटीन असते. दूधातील तत्व प्रोटीन अमिनो एसिड्स मानवाच्या शरीरासाठी आवश्यक असतात.  दुधाच्या सेवनाने हाडं मजबूत राहण्यास मदत होते. शारीरिक मानसिक आरोग्य  चांगले राहते. प्रोटीन्सव्यतिरिक्त कॅल्शियमसाठीसुद्धा हा चांगला पर्याय आहे.

ताक

१०० ग्राम ताकात जवळपास ४ ग्राम प्रोटीन्स असतात. प्रोटीन्स, कॅल्शियम, पोटॅशियम, आणि व्हिटामीन बी चा चांगला स्त्रोत आहे. याच्या नियमित सेवनाने शरीर मजबूत राहते  ताकाचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात. ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते, शरीर थंड राहतं आणि हार्ट हेल्थ चांगली राहते. 

चिझ

१०० ग्राम चिझमध्ये जवळपास २५ ग्राम प्रोटीन असते. चिझमध्ये प्रोटीन्सबरोबरच, फॉस्फरेस आणि व्हिटामीन डी असते.  ज्यामुळे हाडं मजबूत राहतात. टिश्यू तयार होण्यास मदत होते. यात फॅट्स कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

Web Title: Eat These 5 High Protein Rich Dairy Products To Gain Weight And Make Your Muscles Bone Strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.