Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

Eating Banana in Piles - Is It Really Good or Bad? मुळव्याधाचा त्रास अंगावर काढणं धोक्याचं, पण आहारात बदल अनेकदा उपयोगी ठरतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2023 12:15 PM2023-05-05T12:15:00+5:302023-05-05T12:16:03+5:30

Eating Banana in Piles - Is It Really Good or Bad? मुळव्याधाचा त्रास अंगावर काढणं धोक्याचं, पण आहारात बदल अनेकदा उपयोगी ठरतो.

Eating Banana in Piles - Is It Really Good or Bad? | मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

मुळव्याधाचा त्रास आहे? तज्ज्ञ सांगतात, केळी खा! पण नेमकी कधी-किती खायची?

मुळव्याध हा एक गंभीर आजार आहे. जो मलाशय आणि गुद्द्वारा मध्ये येणा-या सूजेमुळे सुरू होतो. हा आजार अनेक कारणांमुळे होतो. मुख्यतः अन्नामध्ये फायबरची कमतरता आणि पाण्याचे कमी सेवन हे याचे प्रमुख कारण आहे. मुळव्याधाचा त्रास कमी करण्यासाठी अनेक लोकं ऑपरेशन करतात. पण जर सुरुवाताची स्टेज असेल तर आपण, घरगुती उपायांचा देखील वापर करू शकता. मुळव्याधाचा त्रास होत असेल तर, त्यावर स्वस्त आणि प्रभावी - घरगुती उपाय केळी आहे.

यासंदर्भात, नोएडा येथील 'कपिल त्यागी आयुर्वेद क्लिनिक'चे संचालक डॉ कपिल त्यागी सांगतात, ''चयापचयाचा थेट संबंध पचन संस्थेशी आहे. अन्नाच्या पचनक्रियेत काही अडथळे आल्यास मुळव्याधासारखा आजार होतो. यावर उपाय म्हणून आपण केळीचे सेवन करू शकता. बद्धकोष्ठता हे मूळव्याधाचे मूळ कारण आहे. मूळव्याधावर केळी का आणि कसे सेवन करावे ते जाणून घेऊया''(Eating Banana in Piles - Is It Really Good or Bad?).

मुळव्याध हा आजार का होतो?

मूळव्याध हा एक त्रासदायक आजार आहे, जो बद्धकोष्ठतेमुळे होतो. या अवस्थेत, गुद्द्वाराच्या नसा सुजतात, ज्यामुळे असह्य्य वेदना जाणवतात. काही वेळेला रक्तस्त्राव देखील होऊ शकते. हा आजार औषध आणि घरगुती उपचारांद्वारे देखील बरे होऊ शकते. यासाठी  हायड्रेटेड राहणे आणि फायबरसमृध्द अन्न खाणे महत्वाचे आहे.

शुगर सतत कमी जास्त होते कारण हमखास होणाऱ्या ५ चुका, वेळीच बदला कारण...

मूळव्याधांवर केळी कशी काम करते?

मुळव्याध हा आजार झाल्यावर पीडित व्यक्तीला आतड्यांसंबंधी हालचाल करताना तीव्र वेदना, जळजळ आणि अस्वस्थता जाणवू लागते. समस्या गंभीर असल्यास रक्तस्त्राव देखील होऊ शकते. यावर केळी हा उपाय उपयुक्त ठरू शकते. केळी गुद्द्वारातील दाह कमी करून मल त्यागाची प्रक्रिया सुलभ करते. केळी बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे, त्यात अ‍ॅंटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने, हे मूळव्याधाच्या समस्येवर घरगुती उपचारामधील एक उत्तम आहार आहे.

केळी जळजळ - वेदनेपासून आराम देते

केळीमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामध्ये प्रतिजैविक गुणधर्म असतात. जे बॅक्टेरिया बाहेर काढून, प्रभावित क्षेत्र बरे करण्यास मदत करतात. केळीच्या सेवनाने गुदद्वाराभोवती जळजळ, व वेदनेपासून आराम मिळतो.

मूळव्याधाचा असह्य त्रास होतो? ५ पदार्थ नियमित खा, पाइल्सचा त्रास होईल कमी

कोणत्या प्रकारच्या केळी खावी?

बद्धकोष्ठता आणि मूळव्याधाच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी, आपण पिकलेल्या केळ्याचे सेवन करू शकता. कच्च्या केळीचे सेवन करणे टाळा, कारण यामुळे वजन आणखी वाढू शकते.

कधी व किती केळी खावे?

डॉक्टरांच्या मते, ''मूळव्याधाच्या समस्येचा सामना करण्यासाठी, रोज रात्री झोपण्यापूर्वी दोन केळी खावीत. यासोबतच आहारात फायबरचा समावेश करा. तसेच दिवसभर पाणी पीत राहा, ज्यामुळे आपले शरीर हायड्रेट राहील.

Web Title: Eating Banana in Piles - Is It Really Good or Bad?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.