हैदराबाद येथिल एका शाळेत दुपारचं जेवण करताना एका 11 वर्षीय मुलींची मृत्यू झाला आहे. असं म्हटलं जात आहे की ही मुलगी इयत्ता सहावीची विद्यार्थीनी होती. एकत्र 3 पुऱ्या खाल्ल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाला. श्वास थांबल्यामुळे या तरूणीला जवळपासच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी दिला मृत्यू घोषित केले. (Eating Food Hastily Can Lead To Death)
ही घटना असे शिकवते की जेवनाता घाई करणं धोकादायक ठरू शकतं. आयुर्वेदानुसार जेवण फक्त पोट भरण्याचं काम करत नाही तर शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उर्जेचा चांगला स्त्रोत आहे. योग्य पद्धतीनं जेवण न केल्यास तब्येतीचं नुकसान होऊ शकतं. आयुर्वेदात याबाबत 3 महत्वपूर्ण नियम सांगण्यात आले आहेत. जेवताना या नियमांचे पालन करायला हवे. (Follow 3 Ayurveda Rules While Having Meal)
आसनावर बसून शांतपणे खा
आयुर्वेदात जेवणाला एक पवित्र क्रिया मानले गेले आहे. जेवताना नेहमी शांत वातावरण बसूनच जेवायला हवे. घाईघाईत खाल्ल्यानं जेवण व्यवस्थित पचत नाही. ज्यामुळे गॅस, अपचन यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. आयुर्वेद सांगते की जेवण व्यवस्थित चावून खाणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक घास हा 32 वेळा चावून खायला हवा. जेणेकरून अन्नाचं व्यवस्थित पचन होईल. वेगानं खाल्ल्यास घास घश्यात अडकू शकते. ज्यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो.
जेवणावर लक्ष केंद्रीत करा
जेवताना लक्ष विचलित होणं, फोन पाहणं किंवा बोलण्यात व्यस्त राहणं. यामुळे तुमच्या पचनक्रियेवर चुकीचा परिणाम होतो. जेवण पूर्ण एकाग्रता ठेवून करायला हवं. जेणेकरून शरीराला व्यवस्थित पोषण मिळेल. ही घटना एक धोक्याची सुचना आहे. आपल्या मुलांच्या जेवणावर लक्ष द्यायला हवं. आयुर्वेदाच्या या नियमांचे पालन करून तुम्ही आरोग्य सुधारू शकता.