Join us   

चार पायऱ्या चढताच दम लागतो? श्वासही फुलतो? न चुकता ५ पैकी १ गोष्ट रोज खा; राहाल फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2024 2:26 PM

Eating for Energy: 5 Superfoods That Naturally Boost Stamina : जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध ५ गोष्टी खाल्ल्याने आरोग्याला फायदेच फायदे मिळतील..

आजकालच्या धावपळीच्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायला अनेकांना जमेलच असे नाही (Stamina Food). कामाचा व्याप, अपुरी झोप, व्यायामाचा अभाव शिवाय सकस आहार न घेतल्याने गंभीर आजारांचा धोका वाढतो (Health Care). अनफिट राहिल्याने आपल्याला दिवसभर काम करण्याची उर्जा मिळत नाही (Stamina Boost). ज्यामुळे दिवसभरातील कामे रखडतात. दिवसभर काम करण्याची उर्जा मिळावी यासाठी काही लोक, एनर्जी ड्रिंक्स आणि विविध प्रकारचे सप्लिमेंट्स घेतात.

पण या गोष्टी शरीराला थोड्या वेळासाठी उर्जा देतात. जर आपल्याला नैसर्गिकरित्या स्टॅमिना वाढवायचं असेल तर, नैसर्गिक आहाराशिवाय उत्तम पर्याय कोणताही नाही. या पौष्टीक पदार्थांमुळे शरीरात तरतरी येते, व दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते(Eating for Energy: 5 Superfoods That Naturally Boost Stamina).

ओट्स

वेट लॉससाठी बरेच जण ओट्स खातात. कार्बोहायड्रेटयुक्त ओट्स शरीराला ऊर्जा प्रदान करतात. ज्यामुळे आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहते, आणि दिवसभर अधिक उर्जावान वाटते. ओट्समध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. याचा फायदा वेट लॉससाठी होतो.

फक्त ३० मिनिटात डाळी भिजवून करा क्रिस्पी मेदूवडे; दाक्षिणात्य चवीचे मेदूवडे हवेत तर..

क्विनोआ

क्विनोआमध्ये प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. हाय प्रोटीनयुक्त क्विनोआ खाल्ल्याने, स्नायूंच्या ऊतींना दुरुस्त करण्यास मदत मिळते. ज्यामुळे आपल्याला हेवी वर्कआउट करण्यास मदत होते. शिवाय हा पदार्थ दिवसभर काम करण्याची उर्जा प्रदान करते.

केळी

पोटॅशियम, कार्बोहायड्रेट्स आणि जीवनसत्त्वे समृद्ध केळी, शरीराला पुरेपूर उर्जा प्रदान करतात. व्यायामामुळे आपल्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात. ज्यामुळे शरीराला वर्कआउट करण्यास उर्जा मिळत नाही. आपण केळी जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर खाऊ शकता. यामुळे शरीरातील स्टॅमिना वाढवण्यास मदत होते.

पोळ्या कडक होतात? पचतही नाही? कणिक भिजवताना घाला १ लहानशी गोष्ट-पोळ्या होतील हेल्दी

पालक

पालक हे पोषक तत्वांचे पॉवर हाउस आहे. लोहयुक्त पालक संपूर्ण शरीराला ऑक्सिजन पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. यामध्ये असलेले मॅग्नेशियम स्नायूंच्या कामावर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. शिवाय थकवा कमी करण्यास मदत करते. आपण वर्कआउट केल्यानंतर पालकाचे सेवन करू शकता. यामुळे दिवसभर उर्जा टिकून राहण्यास मदत होते.

चिया सीड्स

वेट लॉसदरम्यान बरेच जण चिया सीड्सचा आहारात समावेश करतात. चिया सीड्समध्ये फायबर, प्रथिने आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. याचे नियमित सेवन केल्याने आरोग्यास लाभ मिळते, व दिवसभर काम करण्याची उर्जा मिळते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य