Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत

जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत

Eating for Energy: Superfoods That Naturally Boost Stamina : या '५' पदार्थांमुळे तुमचा स्टॅमिना वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2024 07:29 PM2024-06-16T19:29:55+5:302024-06-16T19:31:31+5:30

Eating for Energy: Superfoods That Naturally Boost Stamina : या '५' पदार्थांमुळे तुमचा स्टॅमिना वाढेल

Eating for Energy: Superfoods That Naturally Boost Stamina | जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत

जरा चाललं की लगेच दम लागतो? रोज खा ५ पैकी १ पदार्थ; वाढेल स्टॅमिना - हाडंही राहतील मजबूत

आजकाल थोडे पण काम केल्यावर थकवा जाणवतो (Stamina). थोडं चाललं की किंवा एक जागी बसल्यावरही दम लागतो. असे का होते याचा विचार आपण कधी केला आहे का? पावसाळ्याच्या दिवसात अशक्तपणा, थकल्यासारखं वाटतं अशा तक्रारी अनेकांच्या असतात (Food). अशा स्थितीत सतत झोपून राहावं वाटतं.

थकवा दूर घालवण्यासाठी काही पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश केला तर स्टॅमिना नक्कीच वाढेल. पण स्टॅमिना वाढवण्यासाठी नेमकं कोणते पदार्थ खावे? हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल हो ना. आहारात आपण ५ पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे स्टॅमिना वाढेल. शिवाय ताकद आणि उर्जाही वाढेल(Eating for Energy: Superfoods That Naturally Boost Stamina).

स्टॅमिना वाढवण्यासाठी कोणते पदार्थ खावे?

कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स

हेल्थ शोट्स या वेबसाईटनुसार, 'शरीरातील उर्जा वाढवण्यासाठी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. इतर कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थांच्या तुलनेत ते हळूहळू पचतील. शिवाय शरीराला दिवसभर काम करण्याची उर्जाही मिळेल.'

जान्हवी कपूरला आवडतो तसा करा मुगाचा डोसा, वाटीभर हिरव्या मुगाचा झटपट पदार्थ-वजन वाढवत नाही

लापशी

फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सयुक्त लापशी आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. ओट्सचे भरडे पीठाचे आपण लापशी तयार करू शकता. हे रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते. शिवाय दिवसभर काम करण्याची उर्जाही मिळते.

क्विनोआ

क्विनोआ हे आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे. जे शरीरातील उर्जा वाढवण्यास मदत करते. आपण आपल्या आहारात क्विनोआचा समावेश करू शकता.

प्रोटीन

स्नायूंच्या दुरुस्तीसाठी आणि वाढीसाठी प्रथिने आवश्यक आहे. यामुळे शरीरातील उर्जा वाढते. शिवाय चयापचयक्रियाही बुस्ट करते. आपण आपल्या आहारात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता.

सद्गुरू सांगतात, कुळीथ डाळ आणि उकडलेले शेंगदाणे खाण्याचे जबरदस्त फायदे; मिळेल ताकद इतकी की..

फळे आणि भाज्या

फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. जे थकवा दूर करण्यास मदत करतात. शिवाय उर्जेची पातळी वाढवण्यास मदत करतात. 

Web Title: Eating for Energy: Superfoods That Naturally Boost Stamina

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.