Join us   

रात्रीच्यावेळी फळे खाताय? फळे आरोग्यासाठी उपयुक्त मात्र, कधी खायची? न्यूट्रिशनिस्ट सांगतात की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2023 3:04 PM

Eating Fruits For Main Meal is Good for Health रात्रीचं जेवण भारतीय पद्धतीने खाणे गरजेचं. हलके आणि सकस अन्न खावे, मात्र फळे खाणे टाळावे..

आजकाल लोकं आपल्या फिटनेस बाबतीत खूप सतर्क झाले आहेत. आरोग्याची योग्य काळजी घेण्यासाठी कित्येक जण व्यायाम शाळेत जाऊन घाम गाळत आहेत. योग असो या डायट अनेक जण तब्येतीला महत्व देताना दिसून येत आहे. काही जण डायटमध्ये दिवस रात्र फळ खात आहे. मात्र, फळे खाण्याची देखील योग्य काळवेळ असते. प्रत्येक फळात विविध गुणधर्म असतात. जे योग्यवेळी खाल्ल्याने त्याचे पौष्टीक तत्वे शरीराला लागतात. मात्र, काही फळे रात्रीच्या समयी खाल्ल्याने त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीराला भोगावे लागते. 

न्यूट्रिशनिस्ट जुही कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर यासंदर्भात माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये तिने सांगितले की, काही लोक रात्रीच्या जेवणात फक्त फळे खातात जे शरीरासाठी चांगले नाही. फळ खाण्याचा काळवेळ असतो. रात्रीचे जेवण हलके करावे मात्र, ते अन्न पौष्टीक तत्वांनी भरपूर असावे.

रात्रीच्या समयी फळे का खाऊ नये..

या संदर्भात न्यूट्रिशनिस्ट जुही कपूर सांगते की, ''जर तुम्ही रात्रीच्या जेवणात फळे खात असाल तर असे अजिबात करू नका. रात्रीचे जेवण हलके आणि संतुलित आहाराने करावे. रात्रीच्या जेवणात पुलाव, खिचडी, ओटमील आणि बाजरीचा डोसा या पदार्थांचा समावेश करावा. वजन कमी करण्यासाठी काही जण अन्न सोडून देतात. असे केल्याने शरीरात पोषक गुणधर्म मिळत नाही.

रात्रीच्यावेळी फळे खाणे ठरू शकते हानिकारक

रात्री फळे खाल्ल्यानंतर पोटाची भूक भागत नाही. अशाने शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाही. पुरेसे प्रोटीन शरीराला न मिळाल्याने शरीर कमजोर बनते. निरोगी चरबीचे सेवन न केल्यामुळे, सांधे निरोगी ठेवण्यास आणि हार्मोनल कार्य सुधारण्यात अडचण येते. केवळ फळांपासून पुरेशी ऊर्जा मिळत नाही आणि केस गळायला लागतात. इतकेच नाही तर याने त्वचा कोरडी, निस्तेज आणि निर्जीव बनू लागते.

रात्रीच्यावेळी काय खायला हवे ?

यासंदर्भात पोषणतज्ञ जुही कपूरने सांगितलं की, ''रात्रीचे जेवण संतुलित असावे. आपले पूर्वजही असाच आहार पाळत असत. रात्रीच्या वेळी पारंपारिक जेवण फायदेशीर ठरते. फळांबद्दल सांगायचे तर, फळे अन्न म्हणून आपण खाऊ नाही शकत. ते मुख्य जेवण नाही. त्यामुळे ते टाळले पाहिजे आणि रात्रीच्या वेळी इतर पर्यायांकडे लक्ष दिले पाहिजे. जसे की..

डाळ - भात 

भात - कढी

खिचडी - कढी

बाजरीची खिचडी

चपाती - भाजी - कढी

बाजरीचा डोसा - चटणी

दलिया 

टॅग्स : फळेहेल्थ टिप्सआरोग्य