२०२२ हे वर्ष सरत चाललं आहे. २०२३ काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आज सर्वत्र नाताळ हा सण उत्साहात साजरा होत आहे. या दिवसात आपण केक्स, कुकीज, पेस्ट्री, मिठाई असे अनेक गोड पदार्थ खातो. मात्र, अती गोड पदार्थ खाल्ल्याने शरीराला इजा पोहचते. वजन वाढणे, शरीरात साखर वाढणे असे समस्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात आहारतज्ज्ञ सांगतात, "सणांच्या दिवसात अनेकांचे वजन वाढते. जर तुम्ही मधुमेहीग्रस्त असाल तर तुम्हाला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, केक-कुकीज इत्यादीमुळे साखरेची पातळी वाढते. वजन वाढण्याची समस्या उद्भवते, त्याची काळजी न घेतल्याने अनेक प्रकारच्या जुनाट आजारांचा धोका वाढू शकतो. सणांच्या या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे."
खाण्यापिण्याबाबत काळजी घ्या
ख्रिसमस-नववर्षाच्या पार्ट्यांमध्ये आपल्या आहाराची विशेष काळजी घ्या. सकस आहार घ्या. केक आणि कुकीज जास्त प्रमाणात खाणे टाळा, या गोष्टींमुळे साखरेची पातळी वाढण्याचा धोका तर असतोच पण त्यामुळे वजनही झपाट्याने वाढते. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. फळ-भाज्यांचे रस सेवन करा जे शरीर डिटॉक्स करतात.
व्यायाम खूप महत्वाचे आहे
शरीर निरोगी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी नियमित व्यायामाची सवय अत्यंत आवश्यक मानली जाते. त्यामुळे वजन आणि साखरेची पातळी दोन्ही नियंत्रित ठेवता येते. सुट्टीच्या काळातही योगा-व्यायाम सुरू ठेवा. हे कॅलरी जलद बर्न करण्यास मदत करतात, ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. आरोग्याला नेहमी प्राधान्य द्या.