Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > फार खाणं झालं, पोट डब्ब झाले? अशावेळी या 4 गोष्टी नक्की करा...

फार खाणं झालं, पोट डब्ब झाले? अशावेळी या 4 गोष्टी नक्की करा...

थंडीच्या दिवसांत लग्नाकार्यामध्ये किंवा गेट टुगेदरच्या निमित्ताने जास्त जेवण होतं, त्यानंतर या गोष्टी आवर्जून करा, होणार नाही त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2021 11:19 AM2021-12-12T11:19:43+5:302021-12-12T11:33:31+5:30

थंडीच्या दिवसांत लग्नाकार्यामध्ये किंवा गेट टुगेदरच्या निमित्ताने जास्त जेवण होतं, त्यानंतर या गोष्टी आवर्जून करा, होणार नाही त्रास

Eating too much, stomach upset? So do these 4 things | फार खाणं झालं, पोट डब्ब झाले? अशावेळी या 4 गोष्टी नक्की करा...

फार खाणं झालं, पोट डब्ब झाले? अशावेळी या 4 गोष्टी नक्की करा...

कधी गेट टू गेदर म्हणून, तर कधी एखाद्या समारंभात, काहीच नाह तर विकेंडला घरी काहीतरी स्पेशन मेन्यू केला म्हणून आपण पोटापेक्षा जास्तच खातो. त्यावेळी आपल्याला किती भूक आहे यापेक्षा समोर असलेले पदार्थ आपल्या खूप आवडीचे असल्याने आपला जीभेवर ताबा राहत नाही आणि आवडले म्हणून आपण खातच सुटतो. आता एखादवेळी असे जास्तीचे खाणे होत असेल तर ठिक आहे. पण सततच तुम्ही गरजेपेक्षा जास्त खात असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. कारण तुम्हाला आवश्यकता नसलेल्या अन्नाचे चरबीत रुपांतर होते आणि ही चरबी शरीरात साठून राहिल्याने लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, डायबिटीस यांसारख्या समस्या उद्भवतात. आता असे जास्तीचे खाणे झालेच तर काही गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात, ज्यामुळे या अतिरिक्त खाण्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होणार नाही. पाहूया अशावेळी काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी....

(Image : Google)
(Image : Google)

१. हलके चाला 

ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण किंवा रात्रीचे जेवण कोणत्याही वेळच्या खाण्यानंतर हलके चालणे आवश्यक आहे. अनेकदा आहारतज्ज्ञही आपल्याला खाल्ल्यानंतर १० मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. यामुळे अन्न पुढे सरकण्यास मदत होते आणि शरीराच्या पचनक्रियेला ताण पडत नाही. अशावेळी तुम्ही घरातल्या घरात चालू शकता नाहीतर घराबाहेरही चालायला जाऊ शकता. पण जेवणानंतर खूप खाल्ले म्हणून चालतच बसलो असे करु नका तर हे चालणे अगदी १० मिनिटांचे आणि कमी वेगाने असायला हवे अन्यथा त्याचा त्रास होऊ शकतो. जोरजोरात जास्त वेळ चालले तर मळमळ आणि पोटदुखी असे त्रास उद्भवू शकतात. 

२. बडीशेप किंवा चूर्ण खा 

पूर्वीच्या काळी जेवळ झाले की बडीशेप, सुपारी अशा गोष्टी खाण्याची पद्धत होती. खाल्लेले अन्न पचण्यासाठी हा एक उत्तम उपाय असायचा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे चूर्ण किंवा बडीशेप आवडते त्याप्रमाणे तुम्ही ते खाऊ शकता. त्यानंतर थोडे कोमट पाणी प्यायल्यास खाल्लेल्या अन्नाचे पचन चांगले होते.   

३. डीटॉक्स वॉटर घ्या 

तुम्ही जेवणात जास्त प्रमाणात सोडीयम खाल्ले असेल तर किंवा जेवण प्रमाणापेक्षा जास्त झाले असेल तर बॉडी डीटॉक्स करण्यासाठी एखादे डीटॉक्स पेय घेणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही कोमट पाण्यात लिंबाचा रस घालून त्यात थोडीशी मिरपूड घालू शकता. यामध्ये मध किंवा मीठ अजिबात घालू नका. तसेच बॉडी डीटॉक्स होण्यासाठी हे पाणी एकदम गटकन पिऊ नका तर एकाजागी बसून एक एक घोट हळूहळू प्या. तसेच तुम्ही जीरा चहा, गवती चहा यांचाही वापर बॉडी डीट़ॉक्स करण्यासाठी पिऊ शकता. 

(Image : Google)
(Image : Google)

४. जेवणानंतर लगेचच झोपू नका 

जास्त जेवण झाल्यानंतर लगेचच आडवे होऊ नका. तुम्हाला जास्त जेवल्यामुळे काहीसे असव्स्थ वाटत असेल तरी आडवे न होता चालत राहा. लगेच आडवे झाल्यामुळे शरीरात अॅसिडी रिअॅक्शन होऊ शकते. यामुळे तुमच्या पचनसंस्थेवर ताण येईल आणि तुम्हाला मळमळ झाल्यासारखे वाटेल. त्यामुळे आडवे होण्यापेक्षा चाला नाहीतर शांत बसा. 


 

Web Title: Eating too much, stomach upset? So do these 4 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.