Join us   

नेलपॉलिश लावलेल्या, नख वाढलेल्या बोटाला ऑक्सिमीटर लावून ऑक्सिजन मोजू नका, कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 3:21 PM

नख वाढलेलं नसेल, नेलपॉलिश लावलेलं नसेल आणि हात फार गार नसतील अशावेळी ऑक्सिजन तपासणे योग्य.

ठळक मुद्दे ...त्यामुळे ऑक्सिजनच्या पातळीची अचूक नोंद होण्यास अडथळा येऊ शकतो.

कोरोना काळात मागील दोन वर्षापासून मास्क, ऑक्सिमीटरचे महत्त्व वाढले आहे. व्यक्तीची ऑक्सिजन पातळी घरच्या घरी तपासण्यासाठी घरोघरी ऑक्सिमीटरचा वापर केला जात आहे. ऑक्सिजन पातळीवरून व्यक्तीच्या प्रकृतीचा अंदाज घेतला जातो. मात्र, ऑक्सिजन तपासणीसाठी ज्या बोटाला ऑक्सिमीटर लावले जाणार आहे, त्या बोटाचे नख वाढलेले नसावे, त्या बोटाच्या नखाला नेलपॉलिश केलेले नसावे. त्यामुळे ऑक्सिजनच्या पातळीची अचूक नोंद होण्यास अडथळा येऊ शकतो. तसेच व्यक्तीचा रक्तदाब सामान्य स्थितीत असताना ऑक्सिजन मोजणे गरजेचे असते.

(Image :Google)

ऑक्सिजन तपासताना काय काळजी घ्यावी?

ऑक्सिजन तपासणी करताना ज्या बोटाला ऑक्सिमीटर लावले जाणार आहे, त्या बोटाचे नख वाढलेले नसावे किंवा नखाला नेलपॉलिश केलेले नसावे. हात थंड झालेले नसावेत. ती व्यक्ती धावून किंवा पळून आलेली नसावी. सामान्य स्थितीतील रक्तदाब असतानाच ऑक्सिजन मोजावा. तसेच उठसूठ ऑक्सिजन तपासण्यापेक्षा गरज असेल तरच पल्स ऑक्सिमीटरने ऑक्सिजन तपासणी करावी. पल्स ऑक्सिमीटर हे शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजण्याचे साधन आहे. आपले हृदय किती चांगल्या पद्धतीने काम करत आहे, याची माहिती पल्स डिव्हाईसद्वारे समजू शकते. तसेच फुफ्फुसासाठी दिलेले औषध किती चांगल्या पद्धतीने काम करते, हे समजण्यासोबतच कोणाला श्वास घेण्यास अडथळा येत असल्यास ते देखील समजते.  निरोगी सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी ९५ ते १०० टक्के असते. मात्र, ही पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी झाल्यास फुफ्फुसाच्या ऑक्सिजन पुरवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कोरोनाचा विचार करता, ऑक्सिजन पातळी ९२ टक्क्यांपेक्षा खाली गेल्यास स्थिती गंभीर मानली जाते.

(Image :Google)

- डॉ. ओमप्रकाश शर्मा सांगतात..

निरोगी व्यक्तीची ऑक्सिजन पातळी ९५ टक्यांपेक्षा अधिक असते. ही पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास फुफ्फुसाच्या ऑक्सिजन पुरवण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. कोरोनाच्यादृष्टीने विचार करता, ऑक्सिजन पातळी ९२ टक्क्यांपेक्षा खाली येणे धोक्याचे असल्याने तत्काळ तज्ज्ञांना सल्ला घ्यावा.

 

टॅग्स : कोरोना वायरस बातम्याआरोग्य