Join us   

लसूण-दालचिनी-काळी मिरी- हाय बीपीचा त्रास असेल तर करा या तिघांशी दोस्ती, पाहा बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2024 4:51 PM

Effective home remedies for high blood pressure : उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणारे स्वयंपाकघरातील ३ मसाले..

उच्च रक्तदाब हे हायपरटेन्शन नावाने सुद्धा ओळखले जाते. या समस्येने अनेक जण त्रस्त आहे. उच्च रक्तदाब वाढण्यामागे अनेक कारणे असू शकतात. तर काही वेळेस ही समस्या अनुवांशिक देखील असू शकते. उच्च रक्तदाबाची समस्या औषधांनी नियंत्रित केली जाऊ शकते (Health Care). पण औषधांचा ओव्हरडोस घेण्यापेक्षा आपण नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाबेवर नियंत्रण मिळवू शकता.

स्वयंपाकघरातील काही मसाले फक्त पदार्थाची चव वाढण्यासाठी नसून, उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही मदत करू शकते (High Blood Pressure). जर या मसाल्यांचा वापर आपण रोजच्या पदार्थात केलात तर, नक्कीच फरक पडेल. पण मसाले कोणते? या मसाल्यांचे सेवन कशा पद्धतीने करावे? आरोग्य तज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी दिली आहे(Effective home remedies for high blood pressure).

लसूण

लसणाच्या पाकळ्या फोडणीत घालताच पदार्थाची चव वाढते. यासह आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. यामध्ये असलेल्या अॅलिसिन कंपाऊंडचे अनेक फायदे आहेत. जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यातील घटक मज्जातंतूंना आराम देण्यासोबतच रक्तप्रवाहही सुधारते. ज्यामुळे रक्तवाहिन्यांवरील दाब कमी होतो आणि रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

४ हिरवीगार पानं करतील बॅड कोलेस्टेरॉल कमी, न चुकता खा- हार्ट राहील ठणठणीत

दालचिनी

दालचिनीच्या सेवनाने हाय बीपीचा त्रास कमी होतो. दालचिनीमध्ये पोटॅशियम असते आणि पोटॅशियम सोडियमचा रक्तदाबावर होणारा परिणाम रोखते, त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. पोटॅशियम रक्तवाहिन्यांना आराम देते. ज्यामुळे ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होते.

बाहेरचं चमचमीत खाऊनही वजन वाढणार नाही! फॉलो करा ४-३-२-१ चा वेट लॉस रूल

काळी मिरी

काळी मिरी पदार्थात घालताच रुचकर लागते. पण याच्या सेवनाने बीपीची समस्या देखील आटोक्यात ठेवता येते. काळी मिरीमध्ये पाइपरिन असते, जे रक्तवाहिन्यांना आराम देते. शिवाय यामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे रक्त प्रवाह सुधारते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्य