Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

Effective Home Remedies to Cure Low Blood Pressure लो बीपीचा त्रास होतो, अशावेळी काय करायचं कळत नाही, त्यावर हा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2023 07:40 PM2023-03-24T19:40:20+5:302023-03-24T19:41:14+5:30

Effective Home Remedies to Cure Low Blood Pressure लो बीपीचा त्रास होतो, अशावेळी काय करायचं कळत नाही, त्यावर हा उपाय

Effective Home Remedies to Cure Low Blood Pressure | ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

ब्लड प्रेशर कमी झालं, कायम लो बीपीचा त्रास होतो? झटपट करण्याचा १ सोपा उपाय

अनेकदा अचानक ब्लड प्रेशर कमी जास्त होत असते. ब्लड प्रेशर कमी झाल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी येणे, हाता - पायांना घाम येणे, चक्कर येणे अशा समस्या उद्भवतात. पण या समस्येकडे आपण दुर्लक्ष करतो. ज्यामुळे आपल्या शरीरात रक्तपुरवठा कमी होतो. बीपीची बहुतेक प्रकरणे अनुवांशिक असतात.

परंतु, खराब जीवनशैली आणि चुकीचे खाणे देखील धोकादायक ठरू शकते. कोणत्याही व्यक्तीचा सामान्य रक्तदाब १२०/८० मिमी एचजी असतो. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब ९०/६० एमएम एचजीच्या खाली जातो, तेव्हा कमी रक्तदाब, किंवा वैद्यकीयदृष्ट्या हायपोटेन्शन असे म्हणतात. यासंदर्भात आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी एक घरगुती सोपा प्रभावी उपाय शेअर केला आहे(Effective Home Remedies to Cure Low Blood Pressure).

हिमालयीन मीठ - बीपीसाठी एक उत्तम आयुर्वेदिक उपचार

डॉक्टरांच्या मते, एक ग्लास साध्या पाण्यात अर्धा चमचा हिमालयीन मीठ (2.4 ग्रॅम) मिसळून प्यायल्याने, कमी रक्तदाबापासून आराम मिळू शकतो. आयुर्वेदानुसार हिमालयीन मीठामध्ये तिन्ही दोष संतुलित करण्याची क्षमता आहे.

पुरुषांच्या तुलनेत महिलांनी कमी मीठ खाणेच बरे, असं डॉक्टर का सांगतात?

रक्तदाब नियंत्रणात ठेवते

हिमालयीन रॉक मीठ पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे. त्यामुळेच रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. जर एखाद्याचा रक्तदाब अचानक कमी झाला असेल तर, या उपायामुळे त्याला त्वरित आराम मिळेल.

आयुर्वेदात हिमालयीन मिठाचे फायदे

हिमालयीन मिठाला गुलाबी मीठ असेही म्हणतात. हे मीठ चवीला खारट आणि किंचित गोड लागते, प्रभावाने थंड आणि पचनाला हलके असते. या मिठामध्ये झिंक, लोह, मँगनीज, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम ही खनिज आढळतात. जी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. सामान्यतः मिठाची चव पित्ताला वाढवते, परंतु हिमालीयन मिठामधील थंड प्रभावामुळे पित्ताचे संतुलन राखण्यास मदत होते.

उन्हाळ्यात फ्रिजमधले गार पाणी प्यावे की आपला जुना माठच बरा? नक्की फायद्याचे काय...

छातीतील कफ बाहेर काढते

डॉक्टरांच्या मते, हिमालीयन मीठ कफ बाहेर काढून, छातीतील रक्तसंचय दूर करण्यास मदत करते. ज्यामुळे छातीतील समस्येपासून आराम मिळतो.

शरीराला हायड्रेट ठेवते

हिमालयातील मीठाचे पाणी शरीरातून विषारी पदार्थ बाहेर टाकते. यासह शरीराला हायड्रेट ठेवते, तसेच नव्याने खनिजे पुन्हा भरण्यास मदत करते.

डोळ्याच्या ५ समस्यांकडे दुर्लक्ष महागात पडू शकते, दृष्टी अधू होण्याचा धोका

घसा खवखवणे आणि खोकल्यासाठी सर्वोत्तम उपाय

घसादुखीसाठी आपण पाण्यात हळद आणि हिमालयीन मीठ टाकून गुळण्या करू शकता. यात डिकंजेस्टंट गुणधर्म आहेत, जे नाक, खोकला आणि घशाची पोकळी साफ करण्यास मदत करते.

Web Title: Effective Home Remedies to Cure Low Blood Pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.