Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण...

अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण...

Effects of Too Much Garlic on the Body फोडणीमध्ये जास्त लसूण घालताय? लसूण चघळण्याची सवय आहे? आरोग्यावर होतील दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2023 02:31 PM2023-05-03T14:31:29+5:302023-05-03T14:32:22+5:30

Effects of Too Much Garlic on the Body फोडणीमध्ये जास्त लसूण घालताय? लसूण चघळण्याची सवय आहे? आरोग्यावर होतील दुष्परिणाम

Effects of Too Much Garlic on the Body | अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण...

अती लसूण खाण्याचे ३ दुष्परिणाम, आवडतो म्हणून जास्त लसूण खाणेही बरे नाही कारण...

लसूण अनेक भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो. लसणाची फोडणी देताच जेवणाची चव वाढते. लसूण हा गुणधर्मांचा खजिना आहे. यामध्ये कॅल्शियम, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन बी १ सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे. यासह रोगप्रतिकारकशक्ती देखील वाढते.

आरोग्याला अनेक फायदे देणारा लसूण, आपण अधिक प्रमाणावर खात असाल तर थांबा, कारण लसूण अधिक प्रमाणावर खाल्ल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकते. त्यामुळे लसणाचा आहारात समावेश करावा, पण दररोज किंवा अधिक प्रमाणावर याचे सेवन करू नये(Effects of Too Much Garlic on the Body).

लसूण जास्त प्रमाणात का खाऊ नये?

यासंदर्भात, झी न्युज या वेबसाईटला माहिती देताना, ग्रेटर नोएडा येथील जीआयएमएस हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले आहारतज्ञ डॉक्टर आयुषी यादव सांगतात, ''लसूण हा आयुर्वेदाचा खजिना मानला जातो, त्यात अनेक पौष्टीक घटक आढळतात. पण त्याचे जास्त सेवन केल्यास आरोग्याला नुकसान देखील पोहचू शकते. लसणाचे सेवन करताना आरोग्याच्या निगडीत काही महत्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.''

रोज सायंकाळी चहा पिता? आरोग्यासाठी अतिशय त्रासदायक कारण...

तोंडामधून दुर्गंधी पसरणे

लसणाचा प्रभाव उष्ण असतो, काही लोकांना लसणाच्या कळ्या चघळण्याची सवय असते, तर काही लोकं ते जास्त प्रमाणात खाण्यास सुरुवात करतात, त्यामुळे तोंडामधून तीव्र वास येतो, ज्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. अशा परिस्थितीत त्याचे सेवन कमी प्रमाणात करा. जर तोंडाच्या निगडीत त्रास असेल तर, याचे सेवन कमी करा.

लो ब्लड प्रेशर

ज्या लोकांचा रक्तदाब कमी आहे, त्यांनी लसूण खाणे टाळावे. कारण, यामुळे लो बीपी म्हणजेच हायपोटेन्शन होऊ शकते, ज्यामुळे शरीर कमकुवत होते व थकवा जाणवतो. त्यामुळे कमी प्रमाणात लसणाचे सेवन करा.

वाढलेले वजन, सुटलेले पोट यावर १ उत्तम घरगुती उपाय, जिरे - बडीशेप पावडर - बघा करून..

छातीत जळजळ

लसणाचे सेवन अधिक प्रमाणावर केल्यास छातीत जळजळ, हार्ट बर्नची समस्या वाढते. लसणात अम्लीय संयुगे असतात, जर जास्त प्रमाणात लसणाचे सेवन केल्यास, छातीत तीव्र जळजळ होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे लसणाचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

Web Title: Effects of Too Much Garlic on the Body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.