Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > दिवाळीत 'ही' पौष्टीक भाजी खायलाच हवी, सुटलेलं पोट - वजनही होईल कमी; मधुमेहींसाठीही फायदेशीर

दिवाळीत 'ही' पौष्टीक भाजी खायलाच हवी, सुटलेलं पोट - वजनही होईल कमी; मधुमेहींसाठीही फायदेशीर

Elephant Foot Yam (JimikAnd) Benefits : थंडीच्या दिवसात नेमकी कोणती भाजी खाल्ल्याने फायदा होतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2024 10:00 AM2024-11-03T10:00:00+5:302024-11-03T10:00:06+5:30

Elephant Foot Yam (JimikAnd) Benefits : थंडीच्या दिवसात नेमकी कोणती भाजी खाल्ल्याने फायदा होतो?

Elephant Foot Yam (JimikAnd) Benefits | दिवाळीत 'ही' पौष्टीक भाजी खायलाच हवी, सुटलेलं पोट - वजनही होईल कमी; मधुमेहींसाठीही फायदेशीर

दिवाळीत 'ही' पौष्टीक भाजी खायलाच हवी, सुटलेलं पोट - वजनही होईल कमी; मधुमेहींसाठीही फायदेशीर

हिवाळ्यात (Winter Health Tips) हंगामी फळं - भाज्या खायलाच हवेत. ज्यात सुरणाचाही समावेश आहे (Elephant Foot Yam). सुरण खाण्याचे अनेक फायदे आहेत (Health Tips). हिवाळ्यात सुरण खायलाच हवे. फिटनेसबाबत सुरणाचे आरोग्यदायी फायदे आहेत. सुरणमध्ये अनेक पोषक तत्व असतात. · सुरणमध्ये पोटॅशियम, फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, अँटी ऑक्सिडंट, ओमेगा ३ फॅटी असे बरेच पोषक तत्त्वे असतात.

त्यामुळे दिवाळी सुरु झाली की, लोक आहारात सुरणाचा समावेश हमखास करतात. सुरण पोटाचे विकारही दूर ठेवण्यास मदत करतात. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. याशिवाय, त्याची प्रकृती देखील उष्ण आहे, जी पोट साफ करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. हिवाळ्यात सुरण खाण्याचे फायदे किती? यामुळे कोणते आजारांवर नियंत्रण मिळवता येते? पाहा(Elephant Foot Yam (JimikAnd) Benefits).

हिवाळ्यात सुरण खाण्याचे फायदे

मधुमेहावर ठेवते नियंत्रण

मधुमेहावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण सुराणाचा आहारात समावेश करू शकता. सुराणामध्ये असणारे कार्बोहायड्रेट त्यातील ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते. ज्यामुळे शरीराला उर्जा मिळते. आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. ज्यामुळे ही सुरण हे मधुमेहग्रस्त रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

हातापायांच्या काड्या पण पोट मात्र खूप सुटलंय? ५ सोप्या टिप्स, शरीर सुडौल -पोट होईल कमी

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

सुरणमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते. यामुळे रक्तातील चांगले कोलेस्टेरॉल तर वाढतेच पण खराब एलडीएल कोलेस्टेरॉलही कमी होते. याशिवाय, त्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे ते हृदयासाठी खूप फायदेशीर ठरते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते

सुरणामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असते. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ति बुस्ट होते. अशा परिस्थितीत, त्याच्या सेवनाने हिवाळ्यात इन्फ्लूएंझा आणि इतर व्हायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

वेट लॉससाठी मदत

सुरणामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित कार्य करते. खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचनक्रिया झाल्याने वेट लॉससाठी मदत होते. शिवाय लवकर भूकही लागत नाही. पोट दीर्घकाळ भरलेले राहते. आणि दिवसभर एनर्जेटिक वाटते.

मूळव्याधींसाठी फायदेशीर

फुग्यासारख्या गोलगुबगुबीत झालाय चेहरा? स्वयंपाकघरातले ५ पदार्थ करतील जादू-चेहऱ्यावरची चरबी कमी होईल चटकन

जर आपल्याला मूळव्याधीचा त्रास असेल, तर आपण आहारात जरूर सुरणाचा  समावेश करावा. सुरणामध्ये फायबरसह दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे मूळव्याधीची लक्षणे कमी करण्यास मदत करतात. 

Web Title: Elephant Foot Yam (JimikAnd) Benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.