Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'या' ३ वस्तू तुमच्याही घरात आहेत? बघा कोणत्या वस्तू आणि काय त्यांचे दुष्परिणाम

आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'या' ३ वस्तू तुमच्याही घरात आहेत? बघा कोणत्या वस्तू आणि काय त्यांचे दुष्परिणाम

3 Most Hazardous Things In Your Home For Health: बहुतांश घरांमध्ये या ३ वस्तू असतातच. तुमच्याही घरात या वस्तू असतील तर त्या वापरणं ताबडतोब बंद करा कारण आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2023 02:40 PM2023-11-06T14:40:24+5:302023-11-06T14:41:35+5:30

3 Most Hazardous Things In Your Home For Health: बहुतांश घरांमध्ये या ३ वस्तू असतातच. तुमच्याही घरात या वस्तू असतील तर त्या वापरणं ताबडतोब बंद करा कारण आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो...

Eliminate these 3 things from your home, 3 most hazardous things in your home for health, stop using these 3 things immediately | आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'या' ३ वस्तू तुमच्याही घरात आहेत? बघा कोणत्या वस्तू आणि काय त्यांचे दुष्परिणाम

आरोग्यासाठी घातक असणाऱ्या 'या' ३ वस्तू तुमच्याही घरात आहेत? बघा कोणत्या वस्तू आणि काय त्यांचे दुष्परिणाम

Highlightsतुमच्याही घरात या वस्तू असतील तर त्या वापरणं ताबडतोब बंद करा कारण आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो...

आपल्या रोजच्या वापरात अशा अनेक वस्तू असतात, ज्या आपण केवळ आपली सोय होते म्हणून किंवा आकर्षण असतं म्हणून वापरत असतो. त्या वस्तूंमुळे आपलं घर कितीही स्मार्ट दिसत असलं तरीही त्याचा खूप वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत आहे, हे आपण विसरून जातो. त्यामुळे तुमच्याही घरात या काही वस्तू असतील, तर त्यांना लगेचच बाहेरचा रस्ता दाखवा (Eliminate these 3 things from your home). कारण या वस्तू आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असून या वस्तू वापरणं म्हणजे आरोग्याशी खेळ करणं आहे. या वस्तू नेमक्या कोणत्या आणि त्यामुळे आरोग्यावर कसे परिणाम होत जातात, याची माहिती ryan_nutrition_coach या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. (stop using these 3 things immediately)

आरोग्यावर वाईट परिणाम करणाऱ्या ३ वस्तू

 

१. रुम फ्रेशनर

घरात प्रसन्न वाटावं म्हणून किंवा मग सणावाराला, पाहूणे घरी येणार असतील तेव्हा बहुतांश घरांमध्ये रुम फ्रेशनर मारलं जातं. त्याचा वापर केल्यानंतर घर आपल्याला सुवासिक, फ्रेश वाटतं.

दिवाळीत घराची साफसफाई करून आजारी पडाल, ५ गोष्टी लक्षात ठेवा- न थकता करा काम

म्हणून आपण त्याचा पुन्हा पुन्हा वापर करतो आणि इथेच नेमकं चुकतो. कारण त्यामध्ये असणारे फॅलाईड्ससारखे केमिकल्स आपल्या श्वसन संस्थेवर खूप वाईट परिणाम करतात. म्हणून त्याचा वापर टाळावा आणि त्याऐवजी वापरायचंच असेल तर एअर प्युरीफायर वापरावं, असा सल्ला त्या व्हिडिओमध्ये दिला आहे.

 

२. प्लास्टिक कंटेनर

हल्ली प्रत्येक घरातच प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. अगदी मुलांना डबा देण्यापासून ते फ्रिजमध्ये भाज्या ठेवण्यापर्यंत अनेक ठिकाणी आपण प्लास्टिक वापरत आहोत.

गंजलेल्या कळकट झालेल्या किचन ट्रॉली ५ मिनिटात होतील चकाचक, बघा १ सोपा उपाय

पण त्यामुळे प्लास्टिकमध्ये असणारे बीपीए आणि पीएफए यांच्यासारखे अनेक घातक पदार्थ आपल्या शरीरात जातात. त्यामुळे प्लास्टिकऐवजी काच, स्टिल यांच्या वापरास प्राधान्य द्यावे.

 

३. नॉनस्टिक पॅन

नॉनस्टिक पॅनवर टेफ्लॉन या केमिकलचा थर असतो.

नव्या स्टाईलचे देखणे- लखलखते आकाशकंदील,  खिशाला परवडणाऱ्या किमतीत- लावा सगळ्यांपेक्षा वेगळा सुंदर आकाशकंदील

त्यामुळे आपण जेव्हा त्यात स्वयंपाक करतो, तेव्हा जास्त तापमानावर त्याचे काही कण आपल्या अन्नपदार्थात जरूर मिसळले जातात आणि कॅन्सरसाठी कारणीभूत ठरतात. 
 

Web Title: Eliminate these 3 things from your home, 3 most hazardous things in your home for health, stop using these 3 things immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.