Join us   

उन्हाळ्यात डोळे चुरचुरतात, लाल होतात? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचा सल्ला, ५ गोष्टी न चुकता करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2024 3:07 PM

Essential Eye Care Tips During Summers : उन्हाळ्यात डोळ्यांच्या संसर्गाची आणि लालसरपणाची समस्या वाढते..

उन्हाळ्यात डोळ्यांच्या समस्या वाढतात (Eye Care Tips). त्यातील एक म्हणजे डोळे लाल होणे. काहीवेळेला डोळ्यांमध्ये लालसरपणा दिसून येतो. शिवाय इन्फेक्शनमुळे डोळे अनेकदा सुजतात (Eye Health). नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थच्या मते, डोळ्यांच्या स्मॉल ब्लड वेसेल्समध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढते. ज्यामुळे डोळ्यात लालसरपणा येतो, आणि डोळे सुजतात. लहान रक्तवाहिन्यांपर्यंत ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात डोळ्यांच्या सुरक्षेबाबत विशेष काळजी घ्यायला हवी(Essential Eye Care Tips During Summers).

डोळे लाल होण्याची कारणं

- वाढती उष्णता

- डोळ्यांवर थेट सूर्यप्रकाश

- जास्त घाम फुटणे

- धुळीमुळे डोळ्यात घाण जमा होणे

- ऍलर्जीक गोष्टींमुळे डोळे सुजणे

- बॅक्टेरियल आणि व्हायरल इन्फेक्शन

- कंजंक्टिव्हायटिस

डोळे लाल झाल्यास अशी घ्या काळजी

व्हा इडलीसारखे हलके! नाश्त्याला खा ५ आंबवलेले पदा‌र्थ! वजन कधी घटलं कळणारही नाही..

डोळ्यांमध्ये लालसरपणा आणि जळजळ होण्याची समस्या असल्यास, घरगुती उपाय म्हणून आईस पॅक लावणे उपयुक्त ठरू शकते. यासाठी ५ ते १० मिनिटे डोळ्यांवर बर्फाचा पॅक ठेवा. शिवाय डोळ्यांना स्पर्श करण्याआधी हात चांगले धुवावेत जेणेकरून संसर्ग टाळता येईल.

कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर टाळा

उन्हाळ्यात जास्त कॉन्टॅक्ट लेन्स वापरणे टाळा. त्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाचा धोका जास्त असतो. लेन्स काढून टाकल्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवा. कॉन्टॅक्ट लेन्स वापरताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्या. याशिवाय, लेन्सचे आयुष्य तपासा आणि वेळोवेळी बदलत रहा.

हायड्रेशन

डोळ्यांच्या कोरडेपणाची समस्या टाळण्यासाठी दिवसभरात पुरेसे पाणी प्या. त्यामुळे शरीरात ओलावा टिकून राहतो आणि पाण्यामुळे शरीरातील संसर्ग दूर होण्यासही मदत होते.

डोळे सतत धुवत राहा

उन्हाळ्यात डोळ्यांमध्ये घाम येतो आणि जळजळ - संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे बाहेरून आल्यानंतर किंवा दिवसभरात ३ ते ४ वेळा डोळे पाण्याने धुवावेत. आपण डोळे धुण्यासाठी थंड पाण्याचा देखील वापर करू शकता.

पोटच्या लेकीला पालक भर उन्हात कारमध्येच 'विसरले', मुलीचा 'श्वास' कोंडला..आणि शेवटी..

सनग्लासेस घाला

डोळ्यांना संसर्गापासून वाचवण्यासाठी, बाहेर जाताना सनग्लासेस लावा, जेणेकरून डोळ्यांचे सूर्यप्रकाश आणि धुळीपासून संरक्षण होईल.

टॅग्स : डोळ्यांची निगाहेल्थ टिप्स