Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

Everyday consume a little bit of honey in warm water and see magic : मध खाल्ल्याने वजन कमी होते, शिवाय थकवा देखील दूर होतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2024 05:34 PM2024-07-05T17:34:17+5:302024-07-05T17:35:11+5:30

Everyday consume a little bit of honey in warm water and see magic : मध खाल्ल्याने वजन कमी होते, शिवाय थकवा देखील दूर होतो

Everyday consume a little bit of honey in warm water and see magic | थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

थकवा येतो काम पूर्णच होत नाही? १ चमचा मधाचा करा ‘असा’ उपाय; सद्गुरू सांगतात वाढेल ताकद

दिवसभरात एक गोष्ट देखील शरीराला अफाट शक्ती देऊ शकते (Sadguru). कर्नाटकातील काही जमातींना जेनुकुरुबा म्हणतात. त्यांना दररोज ३० ते ४० किलोमीटर जंगलात फिरावे लागते (Health Tips). किमान ५० झाडांवर चढून आणि उतरून काम करावे लागते. एवढी मेहनत घेऊन ते काम करतात, दिवसभर हे काम करण्यासाठी शरीराला शक्ती आणि उर्जेची गरज भासते (Honey and warm Water). यासाठी ते मधाचे सेवन करतात.

सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की, कर्नाटकातील ही लोकं सकाळी सर्वात आधी मध पितात. तीन-चतुर्थांश लिटर मध पितात. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात. मध रोज खाल्ल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. दिवसात किती मध खावे हे तुमच्या शरीरावर अवलंबून असते. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा'(Everyday consume a little bit of honey in warm water and see magic).

दररोज मध खाण्याचे फायदे

दररोज मध खाण्याचे अनेक फायदे आहेत. सद्गुरूंच्या मते ज्यांना कफाची समस्या आहे, त्यांनी मधाचे सेवन करावे. यामुळे कफाची समस्या आपल्याला छळणार नाही.

आईबाबांची पावसाळ्यात घ्या जास्त काळजी, ३ गोष्टी खायला देणं टाळा! त्रासदायक आजारांचा धोका

१ चमचा मध खाण्याचे फायदे

- हृदयासाठी फायदेशीर

- मेंदूसाठी उत्तम

- उर्जा प्रदान करते

- मानसिक आरोग्य सक्रीय ठेवते

मध खाण्याची योग्य पद्धत

सद्गुरू सांगतात, मध खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण ते गरम करून खाऊ नये. पण आपण कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता. कोमट पाण्यात मध घातल्याने एक विशेष एंझाइम तयार होते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते. जर आपण थंड पाण्यात मध घालून पीत असाल तर, वजन वाढू शकते.

लोहाची कमतरता निर्माण होत नाही

ॲनिमियाच्या रुग्णांमध्ये लोहाची कमतरता असते. यामुळे शरीरातील उर्जा कमी होणे, थकवा जाणवणे, शरीराच्या अवयवांपर्यंत ऑक्सिजन न पोहोचणे अशा समस्या उद्भवू शकतात. यावर उपाय म्हणून कोमट पाण्यात मध मिसळून प्या. यामुळे लाल रक्तपेशी वाढू शकतात.

पावसाळ्यात शिळं अन्न खाताय? किती तासांनी पदार्थ खाल्ले तर फूड पॉयझनिंगचा धोका, आजारांना आमंत्रण

सकाळी अशा प्रकारे मध प्या

कडुलिंब आणि हळदीच्या पाण्यात मध घालून प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडते. ज्यामुळे शरीरातील लवचिकता वाढते, आणि आजारांचा धोकाही कमी होतो. 

Web Title: Everyday consume a little bit of honey in warm water and see magic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.