Join us   

दररोज उपाशीपोटी मुठभर भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे ५ फायदे, शेंगदाणे भिजवूनच खा कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2023 4:30 PM

Everything You Need to Know about Soaked Peanut Benefits शेंगदाणे भाजलेले आवडतात, खारे शेंगदाणेही आवडतात पण साधे शेंगदाणे भिजवून खाणं जास्त चांगलं कारण..

अनेक जण टाईमपास म्हणून शेंगदाणे खाणं पसंद करतात. विविध पाककृतींमध्ये आपण शेंगदाणा घालतो. अनेक जण याला गरीबांचा शेंगदाणा देखील म्हणतात. नियमित योग्य प्रमाणात शेंगदाणे खाल्ले तर, यातून शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, शेंगदाणा भाजून खावा की भिजवून? शेंगदाणे कधी खावा?

क्लिनिकल पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ गरिमा गोयल यांच्या मते, शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ले तर शरीराला जास्त फायदा होतो. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, कॅल्शियम, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, व हेल्दी फॅट्स आढळतात. त्यामुळे नियमित शेंगदाणे खाल्ल्याने शारीरिक आरोग्यापासून मानसिक, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरते(Everything You Need to Know about Soaked Peanut Benefits).

भिजवलेले शेंगदाणे खाण्याचे फायदे

पचनसंस्था सुधारते

सकाळी भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. यासह पोटाच्या अनेक समस्यांपासूनही आराम मिळतो. त्यामुळे सकाळी उपाशी पोटी मुठभर शेंगदाणे खा. जर आपण वजन कमी करत असाल तर, सकाळी शेंगदाणे खाल्ल्याने वारंवार भूक लागत नाही.

१ महिनाभर चपाती खाणं पूर्णपणे बंद केलं तर काय होईल? तज्ज्ञ सांगतात, काय काय बदलेल..

स्नायू मजबूत करते

शेंगदाण्यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते. भिजवलेले शेंगदाणे खाणे स्नायूंच्या वाढीसाठी आणि विकासासाठी खूप फायदेशीर आहे. 100 ग्रॅम शेंगदाण्यात सुमारे 25 ग्रॅम प्रोटीन असते. प्रथिने आरोग्यासाठी एक आवश्यक मॅक्रोन्यूट्रिएंट आहे.

हृदयासाठी फायदेशीर

शेंगदाण्यांमध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होते. यासह मेटाबॉलिज्म बुस्ट होते. आणि ब्लड सर्क्युलेशनही योग्यरीत्या होते. ज्यामुळे हृदयाला पुरेसे पोषण मिळते. व हृदय योग्य प्रकारे कार्य करते.

पावसाळ्यात प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून नियमित खा ५ गोष्टी, आजारपणं राहतील लांब

मेंदूसाठी फायदेशीर

बदामासारखे भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्यानेही मानसिक आरोग्य सुधारते. यामुळे स्मरणशक्ती वाढते आणि मन तीक्ष्ण होते.

त्वचा - केसांसाठी फायदेशीर

भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने त्वचा आणि केसांना खूप फायदा होतो. यात अनेक पोषक तत्व आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि केसांना मजबुती मिळते.

टॅग्स : हेल्थ टिप्सआरोग्यअन्न