Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डेंग्यूचे डास नक्की कधी चावतात, नेमक्या वेळा कोणत्या? डेंग्यूची लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा

डेंग्यूचे डास नक्की कधी चावतात, नेमक्या वेळा कोणत्या? डेंग्यूची लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा

असं म्हणतात की डेंग्यूचा (dengue) डास हा दिवसातून दोन वेळा खूप जास्त ॲक्टीव्ह असतो. कोणत्या बरं असतात या वेळा? स्वत:ला आणि कुटूंबाला डेंग्यूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा काही गोष्टींची माहिती असलीच पाहिजे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2021 01:29 PM2021-10-29T13:29:54+5:302021-10-29T13:34:52+5:30

असं म्हणतात की डेंग्यूचा (dengue) डास हा दिवसातून दोन वेळा खूप जास्त ॲक्टीव्ह असतो. कोणत्या बरं असतात या वेळा? स्वत:ला आणि कुटूंबाला डेंग्यूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा काही गोष्टींची माहिती असलीच पाहिजे.

Exactly when do dengue mosquitoes bite, at what times? Recognize the symptoms of dengue, be alert in time | डेंग्यूचे डास नक्की कधी चावतात, नेमक्या वेळा कोणत्या? डेंग्यूची लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा

डेंग्यूचे डास नक्की कधी चावतात, नेमक्या वेळा कोणत्या? डेंग्यूची लक्षणं ओळखा, वेळीच सावध व्हा

Highlightsदिवसभरातून दोन वेळा डेंग्यूचा डास अतिशय ॲक्टीव्ह असतो, असे काही अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. या दोन वेळा प्रत्येकाने सांभाळाव्या आणि त्यावेळी विशेष काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ सांगतात.

पावसाळा संपून थंडीला सुरुवात झाली की दरवर्षी डेंग्यूचे डास डोके वर काढतात. सध्यादेखील तशीच परिस्थिती आहे. कोरोना रूग्णसंख्या मर्यादित असली तरी डेंग्यू (dengue) हा आजार मात्र चांगलाच पसरतो आहे. अशातच घरोघरी दिवाळीची स्वच्छता, आवराआवरी आणि खरेदीही सुरु झाली आहे. या सगळ्या गडबड गाेंधळात स्वत:ला आणि कुटूंबाला सुरक्षित ठेवायचे असेल, तर डेंग्यू आणि डेंग्यूचा डास याबाबत काही मुलभूत माहिती निश्चितच असली पाहिजे. असं म्हणतात की डेंग्यूचा डास हा दिवसातून दोन वेळा खूप जास्त ॲक्टीव्ह असतो. या दोन वेळा जाणून घेतल्या आणि त्यानुसार काळजी घेतली तरी डेंग्यूचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो. 

 

आपल्याला डेंग्यूचा डास चावला आहे, हे कसं ओळखायचं?
प्रत्येक डास चावल्यामुळे डेंग्यू होत नाही, हे आपल्याला माहितीच आहे. एडीस इजिप्ती या प्रजातीचा डास चावला तरच डेंग्यू होतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार एडीस इजिप्ती हा डास आणि अन्य प्रजातीचा डास जेव्हा चावतो, तेव्हा त्या दोघांचाही दंश वेगवेगळा असतो. पण सर्वसामान्य मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो किंवा गडबडीत डास चावला हे आपल्याला चटकन लक्षातही येत नाही, त्यामुळे आपण या दोन दंशामधला फरक ओळखू शकत नाही. पण डेंग्यू पसरविणारा एडिस इजिप्ती डास जर चावला तर तेथील त्वचा अधिक लालसर होते, असं तज्ज्ञ सांगतात. 

 

कधी दिसून येतात डेंग्यूची लक्षणे?
एडिस इजिप्ती डास चावल्यानंतर साधारणपणे ४ ते १० दिवसांमध्ये डेंग्यूची लक्षणे दिसून येतात. वय, प्रकृती, फिटनेस आणि प्रतिकारशक्ती यानुसार प्रत्येकामध्ये लक्षणे दिसून येण्याचा कालावधी वेगवेगळा असू शकतो. 

 

डेंग्यचूी लक्षणे कोणती?
- खूप जास्त ताप येणे. डेंग्यूचा ताप हा सहसा १०३ डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक असतो.
- अंगदूखी, अशक्तपणा आणि खूप जास्त थकवा येणे
- पोट दुखणे
- जॉईंट्स आणि स्नायूंमध्ये वेदना
- अंगावर लाल पुरळ उठणे
- डोळे लाल होणे
- काहीही खाण्याची इच्छा न होणे
- वारंवार उलट्या होणे

 

कधी चावतो डेंग्यूचा डास?
दिवसभरातून दोन वेळा डेंग्यूचा डास अतिशय ॲक्टीव्ह असतो, असे काही अभ्यासावरून सिद्ध झाले आहे. त्यामुळे या दोन वेळा प्रत्येकाने सांभाळाव्या आणि त्यावेळी विशेष काळजी घ्यावी, असे तज्ज्ञ सांगतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की सुर्य उगवल्यानंतर दोन तास आणि दुपारच्यावेळी डेंग्यूचे डास खूप जास्त ॲक्टीव्ह असतात. त्यामुळे या दोन वेळांमध्ये डेंग्यूचा डास चावण्याची शक्यता खूप जास्त असते. पायाचे घोटे आणि हातांचे कोपर या दोन ठिकाणी डेंग्यूचे डास सर्वाधिक चावत असल्याचेही काही अभ्यासानुसार सांगण्यात आले आहे. या डासाचा एक दंशही डेंग्यू होण्यासाठी पुरेसा आहे, हे लक्षात घ्या आणि सावध रहा. 

 

डेंग्यूचा डास चावू नये म्हणून काय काळजी घ्यावी?
- prevention is better than cure हे डेंग्यूच्या बाबतीत अगदी खरे आहे. कारण डेंग्यू झाल्यास त्यातून पुर्णपणे बरे व्हायला खूप जास्त कालावधी लागतो. डेंग्यू झालेल्या माणसाची प्रतिकारशक्ती खूप कमी होते आणि खूप जास्त अशक्तपणा, थकवा येतो.
- आपल्या आसपासच्या परिसरात थोडी स्वच्छता पाळली आणि थोडी काळजी घेतली तर डेंग्यूला रोखणे सहज शक्य आहे. 
- आपल्या घरात, अंगणात, गच्चीवर कुठेही पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्या. तसेच जेथे डबके, साचलेले पाणी दिसते, अशा ठिकाणी जाणे, उभे राहणे आणि बसणे टाळावे. 


- झाडांना पाणी टाकताना जर प्लेटमध्ये किंवा इतर ठिकाणी कुठे पाणी साचून राहत असेल, तर ते पाणी तातडीने काढून टाकावे.
- पुर्ण बाह्या असलेले कपडे घालून बाहेर जावे.
- डासांपासून सुरक्षा देणाऱ्या mosquito repellants चा वापर करावा.
-  आहारातून आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न करावा. 

 

Web Title: Exactly when do dengue mosquitoes bite, at what times? Recognize the symptoms of dengue, be alert in time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.