Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > एक चमचापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? जागतिक आरोग्य संघटना म्हणते..

एक चमचापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? जागतिक आरोग्य संघटना म्हणते..

Excessive salt, sugar, protein increase risk of kidney stones : मीठ खावे पण ज्यांना जास्त मीठ खाण्याची सवय आहे, त्यांनी एकदा ही माहिती वाचाच; किडनी आरोग्यासाठी घातक..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2024 11:12 AM2024-01-01T11:12:45+5:302024-01-01T11:13:51+5:30

Excessive salt, sugar, protein increase risk of kidney stones : मीठ खावे पण ज्यांना जास्त मीठ खाण्याची सवय आहे, त्यांनी एकदा ही माहिती वाचाच; किडनी आरोग्यासाठी घातक..

Excessive salt, sugar, protein increase risk of kidney stones | एक चमचापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? जागतिक आरोग्य संघटना म्हणते..

एक चमचापेक्षा जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? जागतिक आरोग्य संघटना म्हणते..

बदलत्या जीवनशैलीत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे. नकळत घडणाऱ्या चुकीच्या सवयींमुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे यावर वेळीच लक्ष ठेवून आरोग्याची काळजी घेतलेली बरी. उत्तम आरोग्यासाठी योग्य आहार घेणं गरजेचं आहे. हेल्दी पदार्थ खाल्ल्याने आरोग्य सुधारते. पदार्थाची चव वाढवण्यासाठी आपण त्यात मिठाचा वापर करतोच. पण अतिप्रमाणात मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

किडनी स्टोन होण्यामागे अनेक कारणं आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जे लोक कमी पाणी पितात आणि जास्त प्रथिनयुक्त आहार घेतात त्यांना किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. मात्र, काही वेळेस युरिक अॅसिड आणि इतर कारणांमुळे किडनी स्टोन होऊ शकतो. किडनी स्टोनवर वेळीच उपचार न घेतल्यास, युरीनरी प्रॉब्लेम, युरिन इन्फेक्शन आणि किडनी खराब होऊ शकते. याबाबत निष्काळजीपणा आरोग्यासाठी घातक ठरू शकते.  शिवाय अधिक मीठ खाल्ल्यानेही किडनी स्टोन होऊ शकतो. असे आपण ऐकलेच असेल. पण खरंच या कारणंमुळे किडनी स्टोन होऊ शकते का?(Excessive salt, sugar, protein increase risk of kidney stones ).

अधिक मीठ खाल्ल्याने खरंच किडनी स्टोन होतो का?

हार्वर्ड हेल्थ रिपोर्टनुसार, जास्त सोडियमयुक्त आहार घेतल्यास किडनी स्टोन होऊ शकते. सोडियम हा मिठाचा सर्वात महत्त्वाचा घटक असून जास्त मीठ खाल्ल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण वाढते. अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की जास्त मीठ खाल्ल्याने किडनी स्टोन होऊ शकते.

५ रुपयांच्या कढीपत्त्यात दडले असंख्य फायदे.. कोलेस्ट्रॉल ते बद्धकोष्ठतेचा त्रास कमी; आयुर्वेदिकतज्ज्ञ आचार्य बालकृष्ण सांगतात..

डब्ल्यूएचओच्या मते, 'लोकांनी दिवसातून ५ ग्रॅमपेक्षा कमी मीठ म्हणजेच एक चमचा किंवा त्याहून कमी खावे. याशिवाय ज्यांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनी मीठ कमी खावे. '

किडनी स्टोन होऊ नये म्हणून काय खावे?

- किडनी स्टोन होऊ नये यासाठी दररोज पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे.

- कॅल्शियमयुक्त पदार्थ खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या टाळता येते. दूध, दही, चीज, सोयाबीन, बदाम आणि हिरव्या पालेभाज्या खा.

- युरिक ऍसिडचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन होऊ शकते. त्यामुळे युरिक ऍसिडयुक्त पदार्थांचे सेवन कमी करा.

गायीचं की म्हशीचं? कोणतं दूध उत्तम? कोणत्या दुधामुळे हाडं मजबूत होतात? कधी, कोणी आणि कोणतं दूध प्यावं? पाहा..

- जास्त प्रमाणात चॉकलेट, चहा आणि अक्रोड खाल्ल्यानेही किडनी स्टोनचा धोका वाढतो. त्यामुळे हे पदार्थ कमी प्रमाणात खा.

- किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड्रिंक्स आणि सोड्याचे सेवन कमी करा.

Web Title: Excessive salt, sugar, protein increase risk of kidney stones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.