Join us   

हेडफोन्सचा अतिवापर, कानासह हृदयाला देखील देईल त्रास, कान आणि मेंदू वाचवायचा तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2022 7:43 PM

Headphone Earphone Ear Damage Problems हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज कानाच्या पडद्याला जाऊन आदळतो. त्यामुळे कानाच्या पडद्याचे प्रचंड नुकसान होते

सध्याच्या काळात हेडफोन्स आणि इअरफोन हे आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत. काम करायचे असो किंवा निव्वळ गाणी ऐकत वेळ घालवायचा असो हेडफोन्स आणि इअरफोनची गरज भासत असते. प्रत्येक व्यक्तीकडे सध्या इअरफोन आहेच. प्रवासात अथवा व्यायामशाळेत इअरफोनचे विविध प्रकार लोकांकडे दिसून येते. आपणही बराच काळ जर हेडफोन वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. संगीत ऐकण्यासाठी काही वेळ हेडफोन वापरणे ठीक आहे, पण ते दीर्घकाळ वापरल्याने आपल्या कानांवर वाईट परिणाम होतो. हेडफोन किंवा इअरफोनमधून येणारा आवाज आपल्या कानाच्या पडद्याजवळ जाऊन आदळतो. त्याच्या अतिवापरामुळे कानाच्या पडद्याचे नुकसानही होऊ शकते. इअरफोनच्या वापरामुळे काय नुकसान होते व त्यापासून बचाव करण्यासाठी कोणते उपाय आहेत, ते जाणून घेऊया.

काय नाही केले पाहिजे

गरजेपेक्षा जास्त वेळ हेडफोन किंवा इअरफोनचा वापर केल्यास आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. बराच काळ हेडफोन्स लावून गाणी ऐकल्यास व्यक्तीचे कान सुन्न अथवा बधीर होऊ शकतात. 

हेडफोन किंवा इअरफोन यांचा अतिवापर हा आपल्या कानांसाठी हानिकारक ठरतोच, पण त्याचा आपल्या हृदयावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजात संगीत ऐकल्याने हृदयावर वाईट परिणाम होतो. यामुळे कर्करोगाचा धोका देखील वाढतो.

डॉक्टरांच्या मते, इअरफोनच्या अतिवापरामुळे कानात वेगवेगळे आवाज येणे, चक्कर येणे, झोप न येणे अशी अनेक लक्षणे दिसू लागतात. आपल्या कानांची श्रवण क्षमता केवळ 90 डेसिबल असते, जी हळूहळू 40-50 डेसिबलपर्यंत कमी होत जाते.

ऑफिसमध्ये किंवा घरी गाणी ऐकताना तुम्ही तुमचे इअरफोन्स एकमेकांशी शेअर करत असाल तर तसे करणे टाळावे. इअरफोन शेअरिंग केल्याने आपल्या कानात संसर्ग होण्याचा धोका खूप वाढतो.

काय केले पाहिजे

कानाला होणारा त्रास टाळायचा असेल, तर गरज असेल तेव्हाच इअरफोन किंवा हेडफोनचा वापर करा. दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा अधिक काळ इअरफोनचा वापर करू नये. ते धोकादायक ठरू शकते.

टॅग्स : लाइफस्टाइलआरोग्य