Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > आंघोळ करण्यापूर्वी ब्रश करता की आंघोळ झाल्यावर ? डॉक्टर सांगतात, नंतर करत असाल तर...

आंघोळ करण्यापूर्वी ब्रश करता की आंघोळ झाल्यावर ? डॉक्टर सांगतात, नंतर करत असाल तर...

Did you know brushing your teeth after shower may cause acne? : चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या वाढतात कारण अनेकजण आंघोळीनंतर ब्रश करतात, तज्ज्ञ सांगतात असं का होतं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 02:32 PM2023-07-19T14:32:36+5:302023-07-19T16:45:45+5:30

Did you know brushing your teeth after shower may cause acne? : चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या वाढतात कारण अनेकजण आंघोळीनंतर ब्रश करतात, तज्ज्ञ सांगतात असं का होतं..

Expert reveals how brushing your TEETH in the wrong way can spread bacteria across your face and cause serious breakouts. | आंघोळ करण्यापूर्वी ब्रश करता की आंघोळ झाल्यावर ? डॉक्टर सांगतात, नंतर करत असाल तर...

आंघोळ करण्यापूर्वी ब्रश करता की आंघोळ झाल्यावर ? डॉक्टर सांगतात, नंतर करत असाल तर...

दररोजची आंघोळ हा आपल्या जीवनाचा एक महत्वपूर्ण भाग आहे. सकाळी उठल्या उठल्या आंघोळ केल्याने आपल्याला फ्रेश व ताजेतवाने वाटते. साधारणतः आपल्याकडे आंघोळ करण्याचे काही नियम असतात. आपण उठल्या उठल्या आधी ब्रश करून आपले दात स्वच्छ करतो, दात स्वच्छ केल्यानंतर आपण आंघोळीकडे वळतो. परंतु आपल्यापैकी काही लोकांना सकाळी उठल्यावर आधी आंघोळ करुन मग त्यानंतर ब्रश करण्याची सवय असते. असे केले असता त्याचे आपल्या आरोग्यावर किंवा त्वचेवर काही गंभीर परिणाम होतात का ?

काहीवेळा आपल्या चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या या वारंवार येत असतात. या सारख्या येणाऱ्या मुरुम, पुटकुळ्या यामुळे आपला चेहरा अतिशय खराब दिसतो. इतकेच नव्हे तर यामुळे आपल्या त्वचेचा पोत देखील खराब होतो. परंतु जर आपल्याला सांगितले की, आपल्या चेहेऱ्यावर येणाऱ्या मुरूम, पुटकुळ्या यांचा संबंध थेट आपल्या दात घासण्याच्या सवयींवर अवलंबून आहे, तर आपला यावर विश्वास बसणार नाही. नुकतीच त्वचा तज्ज्ञ डॉ. गीतिका गुप्ता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर याबाबत माहिती दिली. तोंडाच्या स्वच्छतेशी संबंधित आपल्या सवयी चेहेऱ्यावरील मुरुमांचे कारण कसे बनू शकते हे त्यांनी सांगितले. डॉक्टरांच्या मते, आंघोळ केल्यानंतर ब्रश केल्यास पिंपल्स होण्याची शक्यता खूप वाढते हे नेमके कसे ते पाहूयात(Expert reveals how brushing your teeth in the wrong way can spread bacteria across your face and cause serious breakouts).

आंघोळीनंतर ब्रश केल्याने त्वचेवर पुरळ येतात का ?

आंघोळीनंतर ब्रश केल्याने त्वचेवर पुरळ येतात का? या प्रश्नाच्या उत्तरात डॉ. गीतिका गुप्ता सांगतात, जेव्हा आपण ब्रश करतो तेव्हा आपल्या तोंडातील वाईट बॅक्टेरिया हे तोंडाबाहेर पडून आपल्या चेहेऱ्याच्या त्वचेवर येण्याची शक्यता असते. हे वाईट बॅक्टेरिया तोंडातून चेहऱ्याच्या त्वचेवर, विशेषत: तोंडाच्या जागी आणि हनुवटीभोवती पसरण्याची दाट शक्यता असते. असे वाईट बॅक्टेरिया तोंडातून बाहेर पडून चेहेऱ्याच्या त्वचेवर पसरले तर या कारणाने आपल्याला चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या येऊ शकतात. 

घोट - घोट पाणी पिण्याचा आहे खास नियम, लठ्ठपणा ते डिहायड्रेशन पर्यंतच्या समस्या होतील दूर...

आंघोळीनंतर ब्रश करणे आणि पुरळ यांचा काय संबंध आहे?

डॉक्टरांच्या मते, मुरुम, पुटकुळ्या हे मुख्यत्वे करुन जास्त तेल, मृत त्वचेच्या पेशी आणि बॅक्टेरिया या कारणांमुळे होतात. अशा परिस्थितीत, दात घासताना, वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडातून त्वचेवर पसरतात, ज्यामुळे आपल्या चेहेऱ्यावर मुरुम, पुटकुळ्या यायला सुरुवात होते. यासाठीच आंघोळीपूर्वी ब्रश करण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून ब्रश करताना हनुवटीवर किंवा त्याच्या सभोवतालच्या भागावर असलेले कोणतेही बॅक्टेरिया किंवा टूथपेस्ट आंघोळ करताना धुतले जाऊ शकतात. यामुळे त्वचेची जळजळ कमी होऊन पुरळ, मुरूम येण्याची समस्या दूर होऊ शकते. 

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी करा ‘उशीचे व्यायाम’! फिट होण्यासाठी पिलो एक्सरसाइजचा पाहा खास प्रयोग...

खूप वर्षे तरुण दिसायचंय-तरुण रहायचंय ? हार्वर्ड विद्यापीठाचा अभ्यास सांगतो ५ गोष्टी न चुकता करा...

यासोबतच त्यांनी निरोगी त्वचेसाठी काही चांगल्या सवयीही सांगितल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे :- 

१. हात स्वच्छ धुवा :- आपल्या चेहेऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी किंवा कोणतेही क्रिम किंवा इतर कॉस्मेटिक्स लावण्यापूर्वी आपले हात स्वच्छ करून मगच चेहेऱ्याच्या त्वचेला स्पर्श करावा. असे केल्याने अस्वच्छ हातांमुळे चेहेऱ्यावर पसरणाऱ्या बॅक्टेरियाचे प्रमाण कमी होते. 

२. ब्रश केल्यानंतर तोंड स्वच्छ धुवा :- सर्वप्रथम दात घासल्यानंतर, आपल्या तोंडाभोवती उरलेली टूथपेस्ट काढून टाकण्यासाठी तोंड पूर्णपणे स्वच्छ धुवा. जेणेकरून जर ब्रश करताना तोंडातील बॅक्टेरिया चेहेऱ्याच्या त्वचेवर इतरत्र पसरले असतील तर ते वेळीच स्वच्छ करणे गरजेचे असते. 

३. चेहेरा स्वच्छ धुवा :- आपल्या त्वचेतील अतिरिक्त तेल, घाण आणि अशुद्धता काढून टाकण्यासाठी चेहेऱ्याच्या स्वच्छतेची वेळोवेळी काळजी घ्यावी. तसेच ब्रश केल्यानंतर आपला चेहेरा संपूर्ण धुतला आहे ना याची एकदा खात्री करुन घ्यावी.

Web Title: Expert reveals how brushing your TEETH in the wrong way can spread bacteria across your face and cause serious breakouts.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.