आपल्या मेंदू सातत्याने ॲक्टीव्ह असतो. बऱ्याचदा काम करून आपण थकतो. थकल्यानंतर एका जागी शांत बसतो. शांत बसल्यावर कधी मोबाईल पाहातो, कधी पुस्तक वाचतो, कधी गाणी ऐकतो तर कधी आपल्याला ज्यातून रिलॅक्स वाटेल असं काही काम करतो. असा थोडासा ब्रेक घेतल्याने आपल्या शरीराचा तर आराम होतो. पण मेंदूचं काय? तुम्ही या ज्या काही कृती करत असता त्या सगळ्यांमध्ये तुमचा मेंदू तर ॲक्टीव्हपणा तुम्हाला साथ देत असतोच.. मग त्याचा आराम कधी होणार? तुमच्या शरीराला जशी आरामाची गरज आहे तशीच गरज तुमच्या मेंदूला सुद्धा आहे. आणि तो आराम त्याला फक्त आपल्या झोपेमुळेच मिळू शकणार आहे. पण नेमकं तिथेच आपण चुकतो आणि निरर्थक कामांमध्ये वेळ घालवत रात्री जागत बसतो. सातत्याने तुम्ही अपुरी झोप घेत असाल तर त्याचा तुमच्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगत आहेत.
रात्री जर तुमची शांत झोप होत नसेल किंवा तुम्ही नेहमीच खूप उशिरा झोपत असाल तर त्याचा मेंदूवर काय परिणाम होऊ शकतो, याविषयी माहिती देणारा व्हिडिओ Steve Bartlett या सोशल मिडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे.
वजन वाढेल म्हणून कार्ब्स खाणं टाळता? तज्ज्ञ सांगतात कार्ब्समुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन
त्यामध्ये मेंदूरोगतज्ज्ञ डॉ. वेंकी सुजुकी असं सांगत आहेत की अपुऱ्या झोपेमुळे विस्मरणाचा त्रास वाढतो. आपण ८ तास झोप घ्यायला हवी. पण काही जण नेहमीच रात्रीची झोप फक्त ४ ते ५ तासांची घेतात. यामुळे तुमच्या मेंदूचा ना आराम होतो ना दिवसभरात तयार झालेल्या मेमरी पक्क्या साठवून ठेवण्यासाठी वेळ मिळतो. यामुळेच हल्ली विस्मरण, अल्झायमर यासारखे त्रास वाढले आहेत.
त्यांनी सांगितलेली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असणाऱ्या लाखो पेशींमधून काही ना काही स्त्रवत असते. यालाच biologiacal waste produce from brain असं म्हणतात. जेव्हा आपण झोपतो तेव्हा मेंदूमधे असणारे एक वाहाते लिक्विड या सगळ्या स्त्रावांना स्वच्छ करते.
तेल लावून चंपी केल्याने केस गळणं थांबतं? नीता अंबानींच्या हेअर स्टायलिस्टने दिली खास माहिती
म्हणजे एकप्रकारे मेंदूमध्ये जमा झालेला कचरा स्वच्छ करण्याचे कामच आपण झोपेत असताना होत असते. पण सातत्याने अपुरी झोप घेतल्यामुळे हे काम व्यवस्थित होत नाही आणि मेंदूवर त्याचा वाईट परिणाम होत जातो. त्यामुळे झोपेच्या बाबतीत कोणतीही हयगय नको, असं त्यांनी सुचवलं आहे.