मंजिरी कुलकर्णी (आहारतज्ज्ञ)
होय साखर हे वय वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण आहे! वय वाढत जाणे किंवा एजिंग ही एक नैसर्गिक क्रिया आहे. तुम्ही आजूबाजूला पाहा, हे लक्षात येईल की फुलं, फळं, प्राणी या सगळ्यांमध्ये वय वाढण्याची जी क्रिया असते ती एकाच पद्धतीने होत असते. ती पद्धत म्हणजे ग्लायकेशन (Glycation). नैसर्गिकरित्या वय वाढणे हे नॉर्मल आहे. पण तुमच्या वय वाढण्याची गती जास्त असणे हे काही नॉर्मल नाही आपण साध्या फळाचे उदाहरण घेऊया. एखादे फळ कच्चे असते तेव्हा ते आंबट असते. जसं जसं त्याची गोडी वाढत जाते म्हणजेच त्यामधली साखर वाढत जाते तसं त्या फळाचं वय वाढतं. पुर्णपणे पिकलेलं फळ हे सर्वात जास्त गोड असतं आणि त्यानंतर खूपच कमी काळामध्ये ते फळ खराब होऊन जातं.
ही अशीच प्रक्रिया आपल्या शरीरात सुद्धा होत असते. तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स खूप महत्त्वाचं कार्य करत असते आणि ग्लुकोज किंवा साखरेचे कार्यही महत्त्वाचेच असते.
वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिता? तब्येतीवर होऊ शकतो वाईट परिणाम- सावध व्हा..
मग नेमका प्रॉब्लेम कुठे होतो तर तुमच्या शरीरामध्ये साखरेचे अतिरिक्त प्रमाण झाले की ही साखर प्रोटीनसोबत मिसळते आणि साखर आणि प्रोटीन्सचे कॉम्प्लेक्स तयार होते आणि हे जे कॉम्प्लेक्स आहे ते तुमच्या पेशींच्या कार्यामध्ये अडथळा आणण्यास सुरुवात करते.
आपण जर त्वचेचे उदाहरण घेतले तर त्वचेमध्ये कोलॅजिन collagen नावाचे प्रोटीन असते. तुमचं साखर खाण्याचं प्रमाण अतिरिक्त असेल तर कोलॅजिन आणि साखर एकत्र येतात आणि त्यामुळे मग कमी वयातच त्वचेवर सुरकुत्या येण्यास सुरुवात होते.
केळी खाल्ल्याने खरंच रक्तातील साखर, वजन वाढते? मधुमेह असणाऱ्यांनी केळी खाणं कितपत योग्य?
कारण कोलॅजिन आणि साखरेच्या एकत्र होण्यामुळे त्वचेमधील पेशींची लवचिकता कमी होते. म्हणून यावर उपाय म्हणजे आहारातले साखरेचे प्रमाण अतिशय कमी करून टाकणे किंवा पूर्णपणे वर्ज्य करणे. ज्या पदार्थांमध्ये नैसर्गिक साखर खूप जास्त आहे असे भात, पोळीसारखे पदार्थ कमी प्रमाणात खाणे.
तारुण्य अधिकाधिक दिवस टिकवून ठेवायचं असेल तर साखरेची साथ सोडावीच लागेल..