Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > 'या' ३ वेळा घातक, यावेळी चहा पिणे टाळले नाही तर तब्येत बिघडणारच, चहा प्या पण..

'या' ३ वेळा घातक, यावेळी चहा पिणे टाळले नाही तर तब्येत बिघडणारच, चहा प्या पण..

Expert says what time of day you should stop drinking tea : चहा- कॉफी पिण्याची सर्वात वाईट वेळ कोणती आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2024 05:36 PM2024-08-14T17:36:14+5:302024-08-14T17:44:31+5:30

Expert says what time of day you should stop drinking tea : चहा- कॉफी पिण्याची सर्वात वाईट वेळ कोणती आहे?

Expert says what time of day you should stop drinking tea | 'या' ३ वेळा घातक, यावेळी चहा पिणे टाळले नाही तर तब्येत बिघडणारच, चहा प्या पण..

'या' ३ वेळा घातक, यावेळी चहा पिणे टाळले नाही तर तब्येत बिघडणारच, चहा प्या पण..

सकाळी किंवा सायंकाळी, चहा आणि कॉफीची तल्लफ या दोन्ही वेळेत येते (Tea). पावसाळ्यात गरमागरम चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा अनेकांना होते. पण चहा आणि कॉफी पिण्याची देखील एक ठराविक वेळ असते (Health Tips). चहा आणि कॉफी मर्यादित प्रमाणात प्यायला हवे. कारण यामुळे आरोग्याचे नुकसान होऊ शकते.

मुख्य म्हणजे एका वेळेत चहा किंवा कॉफी प्यायला हवे. काही लोक जेव्हा तल्लफ येईल तेव्हा चहा किंवा कॉफी पितात. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. चहा आणि कॉफी पिण्याची देखील एक ठराविक वेळ असते. जर चुकीच्या वेळेत प्याल तर, आरोग्य बिघडू शकते(Expert says what time of day you should stop drinking tea).

भरपूर चालूनही वजन घटेना? 'या' पद्धतीने - 'या' वेळी चाला, वेट लॉस होणारच; फक्त चालताना..

दिवसाच्या या ३ वेळेत चहा किंवा कॉफी पिणे टाळा

सकाळी

द हेल्थ साईट. कॉम, आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार यांच्या मते, काहींना सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढते. ज्यामुळे स्ट्रेस वाढतो. आणि दिवसभर अस्वस्थ आपल्याला वाटू शकते.

कायम हिमोग्लोबिन कमी होतं, अंगात रक्त कमी? ’हे’ ४ पदार्थ खाणं करा बंद-आयर्न होते कमी

जेवणानंतर चहा - कॉफी पिणे टाळा

अनेकांना भजी किंवा जेवणानंतर चहा पिण्याची सवय असते. जेवणानंतर आपल्याला चहा पिण्याची सवय असेल तर, वेळीच बदला. यामुळे शरीरात प्रथिने आणि लोह शोषण्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते.

संध्याकाळी चहा पिणे टाळा

दीक्षा भावसार यांच्या मते, लोकांनी दुपारी ४ नंतर चहा पिणे टाळावे. झोपण्याच्या किमान ६ तास आधी, कॅफिनयुक्त पेय पिणे टाळावे. कॅफिनमुळे झोपेचं चक्र बिघडू शकते.

Web Title: Expert says what time of day you should stop drinking tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.