Join us   

सतत स्क्रीनकडे पाहून डोळे थकतात, कोरडे होतात? सोपा उपाय, ५ मिनीटांत मिळेल आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2022 11:47 AM

Eye Care Tips 6 Facial Points to Relax Eyes : डोळ्यांच्या आजुबाजूचे कोणते पॉईंट दाबले तर आपल्या डोळ्यांचा ताण कमी होऊ शकतो याविषयी

ठळक मुद्दे डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात सोपे उपाय...सतत स्क्रीनसमोर असल्याने डोळे थकले असतील तर ५ मिनीटांत थकवा होईल दूर

दिवसभर हातात मोबाईल आणि डोळ्यासमोर लॅपटॉप ही आता बहुतांश जणांची गरज आणि सवय आहे. आपल्यापैकी अनेकांचा स्क्रीनशिवाय आपल्या आयुष्यातला एकही दिवस जात नाही. अनेकदा आपण झोपेतून उठल्यावर सकाळी सगळ्यात आधी हातात मोबाईल घेतो आणि रात्री झोपतानाही आपल्या हातात फोन असतोच. त्यामुळे लहान वयातील मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच डोळ्यांशी निगडीत काही ना काही समस्या उद्भवतात. डोळे कोरडे पडणे, लाल होणे, चिकटणे, डोकं दुखणे, चष्मा लागणे, थकवा आल्यासारखे होणे अशा काही ना काही समस्या सुरू होतात (Eye Care Tips 6 Facial Points to Relax Eyes).  

स्क्रीन टाईम कमी करणे हा यावरील सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. पण कामासाठी तर आपल्याला लॅपटॉप किंवा स्क्रिनकडे पाहण्याशिवाय पर्याय नसतो. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ जूही कपूर डोळ्यांचा ताण कमी करण्यासाठी काही सोपे उपाय सांगतात. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत डोळ्यांच्या आजुबाजूचे कोणते पॉईंट दाबले तर आपल्या डोळ्यांचा ताण कमी होऊ शकतो याविषयी त्या अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती आपल्यासोबत शेअर करतात. त्यांनी दाखवलेला प्रत्येक प्रेशर पॉईंट १ मिनीटासाठी दाबला तरी डोळ्यांवरचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होतो. 

(Image : Google)

आयुर्वेदानुसार डोळ्याच्या आजूबाजूच्या भागातील ६ प्रेशर पॉईंट जूही आपल्याला दाखवतात. अगदी ५ मिनीटांत होणारा हा सोपा उपाय नियमित केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याची अतिशय चांगली मदत होते. मात्र हे करताना त्या प्रेशर पॉईंटवर खूप दाब देऊ नये नाहीतर त्रास होऊ शकतो. तसेच १ मिनीटापेक्षा जास्त वेळ हे करु नये कारण हे हाय प्रेशर पॉईंट असल्याने जास्त दाब पडला तर त्रास होण्याची शक्यता असते. याचे फायदे आणि हे उपाय कोणी करु नयेत ते पाहूया...

फायदे 

१. कमी प्रमाणात डोकेदुखी असेल तर थांबते. २. फ्रेश आणि उत्साही वाटते.  ३. डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ४. डोळे चमकदार दिसण्यास मदत होते. ५. डोळ्यांचा कोरडेपणा आणि थकवा दूर होतो.  ६. नजर सुधारते आणि स्क्रीनमुळे येणारा ताण कमी होतो.

हा उपाय कोणी करु नये?

१. ज्यांना चेहऱ्याला काही इजा असेल अशांनी  २. डोळ्यांचे विकार किंवा ग्लुकोमा असलेल्यांनी  ३. रेटीनाशी निगडीत समस्या  ४. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सडोळ्यांची निगालाइफस्टाइल