Lokmat Sakhi >Health >Lifestyle Diseases > डोळे चुरचुरतात, पाणी वाहतं- स्क्रीनकडे पाहून शीण आला? फक्त १ गोष्ट- डोळ्यांचा त्रास होईल कमी

डोळे चुरचुरतात, पाणी वाहतं- स्क्रीनकडे पाहून शीण आला? फक्त १ गोष्ट- डोळ्यांचा त्रास होईल कमी

Eye Care Tips Pran Mudra : प्रसिद्ध योगतज्ज्ञ जुही कपूर डोळ्यांना आराम मिळावा यासाठी नेमके काय सांगतात पाहूया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2023 05:30 PM2023-03-21T17:30:57+5:302023-03-21T18:00:12+5:30

Eye Care Tips Pran Mudra : प्रसिद्ध योगतज्ज्ञ जुही कपूर डोळ्यांना आराम मिळावा यासाठी नेमके काय सांगतात पाहूया...

Eye Care Tips Pran Mudra : Looking at the laptop all day, tired eyes? If you want to get rid of eye complaints, do 1 thing regularly... | डोळे चुरचुरतात, पाणी वाहतं- स्क्रीनकडे पाहून शीण आला? फक्त १ गोष्ट- डोळ्यांचा त्रास होईल कमी

डोळे चुरचुरतात, पाणी वाहतं- स्क्रीनकडे पाहून शीण आला? फक्त १ गोष्ट- डोळ्यांचा त्रास होईल कमी

डोळे हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. आजुबाजूचे जग अनुभवण्यासाठी आपण दिवसातील बहुतांश तास डोळ्याने असंख्य गोष्टी पाहत असतो. म्हणूनच हे डोळे कायम चांगले असणे अतिशय आवश्यक असते. दिवसभर आपण लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर काम करत असतो, त्यामुळे डोळ्यांना ताण येतो. याशिवाय गाडीवर फिरल्यामुळेही अनेकदा डोळ्यांमध्ये धूळ जाणे, वारा लागणे, डोळ्यांना ताण येणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे डोळे चुरचुरणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून पाणी येणे अशा समस्या निर्माण होतात. म्हणूनच डोळ्याला विश्रांती मिळण्यासाठी योगामध्ये खास मुद्रा सांगण्यात आली आहे. प्रसिद्ध योगतज्ज्ञ जुही कपूर यांनी डोळ्यांना आराम मिळावा यासाठी कोणती मुद्रा सांगितली आणि त्याचा कसा उपयोग होतो ते पाहूया (Eye Care Tips Pran Mudra)...

(Image : Google)
(Image : Google)

न चुकता करा प्राण मुद्रा, कारण...

नजर किंवा दृष्टी सुधारावी यासाठी ही मुद्रा अतिशय उपयुक्त असते. केवळ डोळ्यांसाठीच नाही तर सायटीका, डोकेदुखी, पायाचे दुखणे, थकवा, सहनशक्तीचा अभाव अशा अनेक गोष्टींसाठी ही मुद्रा अतिशय फायदेशीर असते. नियमितपणे ही मुद्रा केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. शरीरातील ऊर्जा म्हणजेच प्राण प्रवाही राहावा यासाठी ही मुद्रा अतिशय फायदेशीर असते. 

प्राण मुद्रा कशी आणि कधी करायची?

नियमितपणे १० मिनीटे ही मुद्रा केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. जेवण झाल्यावर २ ते ३ तासांच्या अंतराने किंवा रिकाम्या पोटी ही मुद्रा करायला हवी. कोणतीही मुद्रा म्हणजे विशिष्ट ऊर्जा शक्ती जागृत करुन ती अधिकाधिक मजबूत बनवण्याचे काम याद्वारे केले जाते. शेवटची दोन बोटे आणि अंगठा एकमेकांना जोडून घ्यावा. दोन्ही हात मांडयांवर ठेवून डोळे मिटून बसावे. यामुळे मोतीबंदू, रातांधळेपणा, रंगांधळेपणे, ग्लुकोमा, कोरडेपणा यांसारख्या डोळ्यांच्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. अतिशय सहज आणि सोपी अशी ही प्राणमुद्रा आपण दिवसातून कोणत्याही वेळेला करु शकतो. त्यामुळे ही मुद्रा नियमितपणे केल्यास त्याचा नजर सुधारण्यास निश्चितच चांगला फायदा होतो.   

Web Title: Eye Care Tips Pran Mudra : Looking at the laptop all day, tired eyes? If you want to get rid of eye complaints, do 1 thing regularly...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.