Join us   

दिवसभर स्क्रिनसमोर असल्याने डोळ्यांवर ताण येतो? १ सोपा उपाय; ५ मिनीटांत मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2023 1:51 PM

Eye Care Tips to Relive Stress on Eyes : सतत स्क्रीनवर असल्याने डोळ्यांवर येणारा ताण दूर होण्यासाठी सोपा उपाय...

ठळक मुद्दे दिवसातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग अवश्य केल्यास डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होईलसतत स्क्रिन वापरल्याने डोळे थकले तर करायला हवा असा सोपा उपाय..

आपल्यातील अनेक जण दिवसभर लॅपटॉपवर काम करतात. आता बऱ्याचशा गोष्टी डिजिटल झाल्याने आपल्याला कॉम्प्युटर, लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रिनशिवाय पर्यायही नसतो. दिवसातील ८ ते १० तास सलग डोळे लॅपटॉपवर असतील तर डोळ्यांना ताण येतो. अनेकदा सतत स्क्रिनकडे पाहिल्याने डोळे कोरडे पडणे, आग होणे, चुरचुरणे, डोकेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. तासनतास स्क्रिनकडे पाहिल्याने चष्मा लागतो आणि नंबरही वाढत जातो. आता यावर उपाय काय? तर डोळ्यांचा ताण घालवण्यासाठी डोळ्यांचे विविध व्यायाम करणे, काही वेळासाठी स्क्रिनपासून दूर राहणे, हिरव्या रंगाकडे पाहणे, डोळे मिटून बसणे असे काही ना काही उपाय करता येतात (Eye Care Tips to Relive Stress on Eyes). 

आज आपण असाच एक अतिशय सोपा उपाय पाहणार आहोत. ज्यामुळे डोळ्यांवर आलेला ताण दूर होण्यास तर मदत होतेच पण आपण फ्रेशही राहू शकतो. प्रसिद्ध योग अभ्यासक जूही कपूर डोळ्यांसाठी एक खास व्यायाम सांगतात. समान मुद्रा असे त्याचे नाव असून आपल्याला ज्याप्रमाणे प्रेम आणि काळजीची आवश्यकता असते त्याचप्रमाणे आपल्या डोळ्यांनाही प्रेम आणि काळजी आवश्यक असते, असे जुही सांगतात. सतत स्क्रीनवर असल्याने डोळ्यांवर येणारा ताण दूर होण्यासाठी ही मुद्रा केल्यास निश्चितच डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. पाहूयात ही मुद्रा कशी करायची आणि त्याचे फायदे... 

समान मुद्रा कशी करायची? 

१. दोन्ही हातांची पाचही बोटे एकमेकांना जुळवायची. 

२. डोळे बंद करुन ही जुळवलेली बोटे पापण्यांवर ठेवायची. 

३. ३० सेकंदांसाठी ही क्रिया करायची. 

४. अगदी सोपी असलेली ही मुद्रा केल्याने नकळत डोळ्यांना आराम मिळण्यास मदत होते. 

फायदे 

१.  आपली ५ बोटं पचमहाभुतांचे प्रतिनिधित्व करतात. समान मुद्रेत सगळी बोटे एकत्र घेत असल्याने पृथ्वी, आप, तेज, वायू, जल ही महाभुते एकत्र येतात आणि त्यांची ऊर्जा आपल्याला बोटांच्या माध्यमातून मिळते. 

२. केवळ ३० सेकंदांची मुद्रा केली तर आपल्याला लगेच आराम मिळेल असे नाही. पण सतत स्क्रिनसमोर असलेल्या डोळ्यांना निश्चितच आराम मिळण्यास मदत होईल.

३. दिवसातून ३ ते ४ वेळा हा प्रयोग अवश्य करा. तुम्हाला याचा परिणाम जाणवेल आणि डोळे काही प्रमाणात तरी रिलॅक्स होत असल्याचा अनुभव येईल.     

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सडोळ्यांची निगा