उन्हाळा असो किंवा हिवाळा, प्रत्येक ऋतूनुसार आरोग्याच्या निगडीत समस्या बदलत राहतात. सध्या उन्हाळा सुरु आहे. सूर्य आग ओकत आहे. या वातावरणात उन्हापासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक उपाय करून पाहतो. थंड पदार्थांचे अधिक प्रमाणावर सेवन करतो. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आपण पाणी जास्त पितो. परंतु, सूर्य किरणांचा अधिक फटका डोळ्यांना सहन करावा लागतो. ज्यामुळे जळजळ, थकवा, डोळे कोरडे होणे या समस्या उद्भवतात. या कारणांमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते. डोळ्यांमध्ये टर्जियम नावाचा रोग होतो. फक्त चष्मा घालून डोळ्यांची काळजी घेतली जाऊ शकत नाही. यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे.
यासंदर्भात, आय केअर सेंटरचे डॉ. जिमी मित्तल सांगतात, ''सूर्यप्रकाशामुळे डोळ्यातील कॉर्निया खराब होऊ शकते. यासोबतच डोळे कोरडे होतात. या कारणामुळे डोळ्यांमध्ये थकवा येतो. उन्हाळ्यात जर डोळ्यांचे सरंक्षण करायचे असेल तर, आहारात देखील काही बदल करायला हवे''(Eye health tips: Excessive heat can harm your eyes.).
उन्हाळ्यात डोळ्यांचे रक्षण करण्याचे उपाय
सनग्लास
उन्हाळ्यात सनग्लास न घालता बाहेर पडल्यास अतिनील किरणांचा प्रभाव थेट डोळ्यांवर होतो. ज्यामुळे टर्जियम नावाचा आजार होतो. त्यामुळे बाहेर पडताना सनग्लास घालायला विसरू नका. सनग्लास कॉर्नियाचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते.
उन्हाळ्यात बदाम खावे का? रोज किती बदाम, नक्की कधी आणि कसे खाल्ले तर फायद्याचं, नाहीतर पोटात गडबड
हायड्रेटेड रहा
उष्णतेपासून डोळ्यांचे सरंक्षण करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात डोळ्यांमधील ओलावा कमी होतो, ज्यामुळे डोळे कोरडे होतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी प्यायला हवे.
आय ड्रॉपचा वापर करा
उन्हाळ्यात डोळ्यांचे सरंक्षण करण्यासाठी फक्त सनग्लास लावून व पाणी पिऊन चालणार नाही. यासाठी आय ड्रॉपचा वापर करणे देखील आवश्यक आहे. डोळ्यांमध्ये आय ड्रॉप टाकल्याने, ओलावा टिकून राहतो.
भयंकर उकाडा, रात्री झोपच लागत नाही? ७ उपाय- घाम कमी-झोपही लागेल शांत
पाण्याने डोळे वारंवार धुवा
उन्हाळ्यात डोळे थंड पाण्याने वारंवार धुवा. असे केल्याने डोळ्यांचा थकवा दूर होतो. व डोळे फ्रेश दिसतात.
डोळ्यांवर काकडी किंवा गुलाब जल लावा
या दिवसात अनेकांना वारंवार बाहेर जावे लागते. उन्हामधून घरी आल्यानंतर काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा. किंवा काकडीचा रस तयार करा, व कॉटन बॉल रसात बुडवून डोळ्यांवर ठेवा. याने डोळ्यांना आराम मिळेल. काकडीचा रस नसेल तर, त्याजागी गुलाब जल वापरा.
डोळ्यांना आराम द्या
सध्या स्क्रीन टायमिंगचे प्रमाण वाढत चालले आहे. ज्यामुळे डोळे प्रचंड थकतात. डोळ्यांना विश्रांती देण्याची गरज आहे. यासाठी दर २० मिनिटांनी डोळ्यांना २० सेकंद विश्रांती द्या.