पावसाळ्याचा आनंद घ्यायला बहुतेकांना आवडते, पण पावसासोबत काही संसर्गही येतात. सतत गळणारं नाक आणि त्यामुळे डोळ्यांची जळजळ, डोळे चुरचुरण्याची समस्या अनेकांन उद्भवते. वारंवार असा त्रास उद्भवल्यास डोळ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. खासकरून पावसाळ्यात ही समस्या टाळण्यासाठी डोळ्यांची काळजी घ्यायला हवी. डॉ. स्नेहा मधुर कंकरिया (सल्लागार नेत्रविकारतज्ज्ञ, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटल, मुंबई) यांनी पावसाळ्यात डोळे चांगले राहावेत यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. (Causes of sore eyes, treatments, and home remedies by eye experts)
पावसाळ्यात हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमचे हात पुसायचे टॉवेल, नॅपकीन, रुमाल स्वच्छ आणि कोरडे ठेवा. तुमचे टॉवेल, डोळ्यांच्या मेकअपचे सामान यांसारख्या वैयक्तिक वस्तू शेअर करू नका. डोळ्यांना स्पर्श करू नका किंवा डोळे चोळू नका कारण हातावर हजारो जीवाणू असू शकतात जे संसर्गाचं कारण ठरू शकतात.
पाणी साचलेल्या जागी थांबणं टाळा. कारण त्या ठिकाणी विषाणू, जीवाणू आणि बुरशी असू शकते. कॉन्ट्रक्ट लेन्स वापरत असलेल्यांनी पावसाळ्यात अशा लेन्स वापरणं टाळावं कारण यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. म्हणून चष्मा वापरावा.
कंजंक्टिव्हायटिस (डोळे येणे), कॉर्निअल अल्सर हे सामान्यणे आढळणारे संसर्ग आहेत. डोळे लाल होणं, चिकट स्त्राव येणं, डोळ्यातून पाणी बाहेर येणं, दृष्टी धुसर होणं अशा समस्या उद्भवत असतील त्वरीत नेत्रविकार तज्ज्ञांची भेट घ्या. ओव्हर द काऊंटर म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधं घेणं टाळावं.
स्वच्छ घासूनही दात पिवळे दिसतात; तुळशीची पानं 'इतके' दिवस चावून खा, पांढरेशुभ्रे दात राहतील
तुमच्या कॉन्टॅक्ट लेन्सची काळजी घ्या. कॉन्टॅक्ट लेन्स हाताळताना नेहमी हात स्वच्छ धुवा. कॉन्टॅक्ट लेन्सस तसेच क्लिनिंग सोल्यूशनच्या मुदत समाप्तीच्या तारखेवर लक्ष ठेवावे. डोळ्यांवर पाण्याचे हबके मारणं टाळावं. आणि त्यात टोळे चुरचुरण्यास कारणीभूत ठरणारे घटक असू शकतात.
डोळ्यांचा संसर्ग झाल्यास डोळ्यांना स्पर्श करणं टाळावं एका डोळ्यामुळे दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होऊ शकतो. पावसाळ्यात जंक फूड खाण्याची इच्छा होत असली तरी संतुलित आहार घ्यावा. कारण रस्त्यावरचे पदार्थ अपायकारक ठरू शकता. डोळ्यांचा मेकअप टाळा. त्यातील केमिकल्समुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.